शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या अशांततेला चीन कारणीभूत - मुफ्ती

By admin | Updated: July 16, 2017 04:15 IST

सिक्किमजवळील डोकलाम पठारावरून सुरु असलेल्या वादास नवा रंग देत चीनने जम्मू-काश्मीरचा भाग असलेला लडाखही वादग्रस्त प्रदेश असल्याचे शनिवारी

नवी दिल्ली/ बीजिंग : सिक्किमजवळील डोकलाम पठारावरून सुरु असलेल्या वादास नवा रंग देत चीनने जम्मू-काश्मीरचा भाग असलेला लडाखही वादग्रस्त प्रदेश असल्याचे शनिवारी म्हटले व पाकिस्तानचा उल्लेख ‘पोलादी मित्र’ असा केला आहे. त्यामुळे दोन देशांतील तणाव आणखी वाढणार असे दिसू लागले आहे.दुसरीकडे काश्मीरमधील अशांततेस पाकिस्तानबरोबरच चीनही कारणीभूत आहे, असा आरोप काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.काश्मीरमध्ये चीनही ढवळाढवळ करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच म्हणणे याचा अर्थ त्यात तथ्य असू शकते.मेहबुबा मुफ्ती यांनी आज सकाळी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी चीनही काश्मीरमध्ये गडबड करीत असल्याचे सांगितले. दरम्यान चीनच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने डोकलाम वादाविषयीच्या भाष्यात म्हटले की, भारताने माघार घेणे हाच वाद मिटविण्याचा एकमेव पर्याय आहे. तसे केले नाही तर भारताची नाचक्की होईल.सन २०१३ व २०१४ मधील घटनांचा उल्लेख करताना चीन म्हणते की, त्यावेळी चीन, पाकिस्तान व भारत यांच्यात लडाख या वादग्रस्त प्रदेशावरून वाद झाला होता. त्यावेळी राजनैतिक वाटाघाटींतून वाद मिटू शकला होता. परंतु आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. (वृत्तसंस्था)