शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील व्यवहार विस्कळीतच

By admin | Updated: July 15, 2016 02:34 IST

संचारबंदीसारखे निर्बंध आणि फुटीरवाद्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन जीवन गुरुवारी सलग सहाव्या दिवशीही विस्कळीत होते

श्रीनगर : संचारबंदीसारखे निर्बंध आणि फुटीरवाद्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन जीवन गुरुवारी सलग सहाव्या दिवशीही विस्कळीत होते. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा ८ जुलै रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३६ वर गेली आहे. श्रीनगरचा काही भाग, उत्तर काश्मीर आणि दक्षिण काश्मीरच्या चार जिल्ह्यांमध्ये ९ जुलैपासून नागरिकांच्या हालचालींवर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घातलेली बंधने अजूनही कायम आहेत. त्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून, भाजीपाला व किराणा मालासाठीही घराबाहेर पडणे लोकांना अशक्य झाले आहे.सार्वजनिक वाहतूक सलग सहाव्या दिवशी बंद आहे. दुकाने, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप बंद असून, सरकारी कार्यालयांत उपस्थिती तुरळक आहे. बँकांचे व्यवहारही बंद असून, एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणेही अवघड झाले आहे.त्यामुळे लोकांमध्ये अधिक राग आहे. वनीच्या मृत्यूनंतर फुटीरवाद्यांनी चार वेळा संपाची हाक दिली आहे. दुकाने, आस्थापना आता शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन फुटीरवाद्यांनी केले आहे. ८ जुलैपासून लोकांना त्यांनी संप पाळण्यास सांगितले होते.दरम्यान, पोलीस आणि सशस्त्र दलाच्या जवानांनी केलेल्या छर्ऱ्याच्या माऱ्यात डोळ्यांना इजा झालेल्यांची संख्या १00हून अधिक झाली आहे. वेळेत उपचार न झाल्यास त्यांना अंधत्व येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्यांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे, त्यांना दिल्लीत उपचारासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)खोळंबासंप आणि निर्बंधांमुळे मोठ्या संख्येने लोकांनी विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत. अनेक कुटुंबे विवाह समारंभ पारंपरिक थाटमाट टाळून व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने करीत आहेत. खोऱ्यातील वृत्तपत्रांमध्ये विवाह समारंभ रद्द झाल्याच्या छोट्या जाहिराती रोजच्या रोज प्रसिद्ध होत आहेत.