शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पुन्हा पाक, इसिसचे झेंडे

By admin | Updated: October 4, 2015 02:52 IST

जम्मू-काश्मिरात श्रीनगरच्या जामिया मशीद आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात इसिस ही अतिरेकी संघटना

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात श्रीनगरच्या जामिया मशीद आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात इसिस ही अतिरेकी संघटना आणि पाकिस्तानचे झेंडे फडकले. यादरम्यान हे झेंडे फडकवणारे युवक आणि पोलिसांत जोरदार संघर्ष उडाला.जामिया मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केली गेल्यानंतर लगेच चेहरा झाकलेल्या युवकांचा एक गट रस्त्यावर उतरला; आणि त्याने पाकिस्तान, इसिस तसेच जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनांचे झेंडे फडकवणे सुरू केले. याश्विाय जमाद-उद-दवाचा प्रमुख हाफिज सय्यद आणि हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सल्लाहुद्दीन यांचे पोस्टर्सही झळकवले. या युवकांच्या हातात उत्तर काश्मीरच्या सोपोरमधील हिंसाचारात ठार झालेला ३ वर्षांचा चिमुकला बरहान आणि सिरियाच्या समुद्रकिनाऱ्यावर ज्याचा मृतदेह आढळला त्या अलयानचे पोस्टर्सही होते. तीन वर्षांचा बरहान आणि त्याचे वडील गत २० सप्टेंबरला सोपोरमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात ठार झाले होते; तर निर्वासितांच्या लोंढ्यातील आपल्या कुटुंबासमवेत निघालेला चिमुकला अलयान याचा गत २ सप्टेंबरला समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. युवकांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी व दहशतवादी संघटनांचे झेंडे फडकवणे सुरू करताच, पोलिसांनी मोर्चा सांभाळला. याचदरम्यान या युवकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या वेळी पोलीस आणि या युवकांमध्ये जोरदार संघर्ष उडाला. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी डझनभर अश्रुधुराची नळकांडी फोडली.