शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

कर्नाटक निकालांमुळे आर्थिक चिंता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:06 IST

आश्वासनांची पूर्ती करताना दमछाक : ग्रामीण भागांवर लक्ष द्यावे लागणार

नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मोदी सरकारसमोर २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे मोठे आव्हान असून, त्यासाठी आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना आर्थिक गाडा रूळांवरून सरकण्याची भीती आहे. ग्रामीण भारतावर अधिक खर्च करताना वित्तीय तूट फुगण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी हा चिंतेचा विषय ठरणार आहे.भारताच्या ग्रामीण भागात ६८ टक्के लोकसंख्या राहते. मतदारांचा हा सर्वांत मोठा घटक आहे. २0२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते. पण त्यावर काहीही काम झालेले नाही. त्यामुळे मोदी यांना काँग्रेसकडून मोठे आव्हान मिळत असल्याचे कर्नाटक आणि गुजरात निवडणुकीत दिसून आले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या आधीपासूनच अर्थसंकल्पावर ताण होता. २0१८ वित्त वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट सरकारला पाळता आले नाही. या वर्षासाठीचे उद्दिष्ट सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.३ टक्के करण्यात आले आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. या वर्षात रुपया डॉलरच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घसरला आहे. महागाईत वाढ होत आहे. भारताचे आर्थिक परिदृश्य काळवंडले आहे. या सर्वांचा ताण अर्थसंकल्पावर पडेल. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिज’चे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुवोदीप रक्षित यांनी सांगितले की, कर्नाटक निवडणुका अर्थव्यवस्थेसाठी अनिश्चिततेचा अतिरिक्त स्रोत बनल्या आहेत. तसेही निवडणुकीपूर्वीच्या वर्षात वित्तीय घसरणीची जोखीम असतेच. कच्च्या तेलाच्या किमतींनी चित्र अधिक बिकट केले आहे. यंदा वित्तीय तूट ३.५ टक्के राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे वित्तीय तूट वाढेल‘एचएसबीसी होल्डिंग पीएलसी’च्या भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले की, निवडणुकीच्या दबावामुळे सरकार पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढविण्याऐवजी उत्पादन शुल्कात कपात करेल. त्यामुळे वित्तीय तूट वाढेल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १0 डॉलरने वाढल्यास भारताची वित्तीय तूट 0.३ टक्क्यांनी वाढेल.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८