शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election Results 2018: कर्नाटकात कमळ; सीएम येडियुरप्पाच, बहुमतासाठी लागणार 112 आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 07:07 IST

कर्नाटकात अखेर कमळ फुलले असून, १०५ आमदार असलेल्या भाजपाला राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे, तसेच पंधरा दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

बंगळुरू : कर्नाटकात अखेर कमळ फुलले असून, १०५ आमदार असलेल्या भाजपाला राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे, तसेच पंधरा दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांचा शपथविधी होणार असून, बहुमताची परीक्षा पास झाल्यावर, इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे कळते. काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) आघाडीतर्फे कुमारस्वामी यांनी ११७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले होते. मात्र, त्यांच्याऐवजी राज्यपालांनी येडियुरप्पा यांना निमंत्रित केले. राजभवनाऐवजी भाजपाचे प्रवक्ते आ. सुरेशकुमार यांनी कानडीमध्ये टिष्ट्वट करून येडियुरप्पांच्या शपथविधीची माहिती दिली होती. मात्र, नंतर हे टिष्ट्वट त्यांनी मागेही घेतले. त्यानंतर, अर्ध्या तासातच राज्यपालांचे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले़ आता कर्नाटकात ‘धन की बात’ सुरू होईल, अशी टीका काँग्रेसने केली.>आमदार अज्ञातस्थळी रवानाभाजपाने काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. काही आमदारांनी स्वत:हून आमच्याशी भाजपाने संपर्क साधला होता, असे जाहीरपणे सांगितले.बहुमतासाठी १0 ते १२ आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. तशी वेळ भाजपाने आणली, असे काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनी सांगितले. कुमारस्वामी यांनीही आपल्या आमदारांसाठी अशीच व्यवस्था केली आहे.>आमदारामागे१00 कोटी?भाजपा एकेका आमदारामागे १00 कोटी रुपये देण्याच्या तयारीत आहे, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला. पण कोणत्या नेत्याने व कोणाला ही रक्कम देऊ केली, हे सांगितले नाही. यावर भाजपानेते प्रकाश जावडेकर यांनी हा काँग्रेस, जनतादलाचा कल्पनाविलास असल्याचे म्हटले आहे़>आमदार फोडावे लागणारएक अपक्ष आमदार पी. शंकर यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केल्याने येडियुरप्पा यांच्याकडे १0५ जण झाले. मात्र तरीही बहुमतासाठी अन्य पक्षांचे आमदार फोडावे लागतील. त्याशिवाय त्यांना बहुमत सिद्ध करताच येणार नाही. त्यामुळे भाजपाने काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांशी संपर्क साधायला सुरुवात केल्याचे कळते.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पा