शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:30 IST

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनंदा या १४ वर्षीय मुलीचा मृतदेह २००० फूट खोल दरीत सापडला. ती ७ एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती.

कर्नाटकच्या चिक्कमगलुरु जिल्ह्यातील चंद्रद्रोणा पर्वतरांगेतील माणिक्यधारा धबधब्याजवळून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांनी अखेर शोधून काढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनंदा या १४ वर्षीय मुलीचा मृतदेह २००० फूट खोल दरीत सापडला. ती ७ एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनंदा ही केरळमधून आलेल्या ४० पर्यटकांच्या एका ग्रुपचा भाग होती. हा ग्रुप ७ एप्रिल रोजी चिक्कमगलुरु येथे पोहोचला होता आणि इनामु दत्तात्रेय पीठ तसेच माणिक्यधारा धबधबा पाहण्यासाठी गेला होता. याच दरम्यान श्रीनंदा अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

शोधमोहिमेत ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांचा वापर

मुलीचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ (SDRF), अग्निशमन विभाग, स्थानिक पोलीस आणि एएनएफ (ANF) च्या पथकांनी संयुक्त मोहीम राबवली होती. चंद्रद्रोणा पर्वतरांगेतील दाट जंगल आणि दुर्गम डोंगराळ भाग शोधमोहिमेत मोठं आव्हान ठरत होतं. खोल दऱ्या आणि दाट जंगलात तपास करण्यासाठी पथकांनी ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांचाही वापर केला.

तीन दिवसांनंतर आढळला मृतदेह

सलग तीन दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर, आज माणिक्यधारा परिसरातील सर्वात खोल दरीत श्रीनंदाचा मृतदेह सापडला. तिचा मृतदेह तब्बल २००० फूट खाली खडकांमध्ये अडकला होता. बचाव पथकाने अत्यंत कष्टाने हा मृतदेह बाहेर काढला.

मुलगी चुकून पाय घसरून दरीत पडली की यामागे आणखी काही वेगळं कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Girl, Visiting Waterfall with Group, Found Dead After Disappearance

Web Summary : A 14-year-old girl, part of a tourist group visiting a waterfall in Karnataka, was found dead after being missing for three days. Her body was recovered from a 2000-foot deep ravine. Police are investigating the cause of death.
टॅग्स :Karnatakकर्नाटकKeralaकेरळ