शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections - सत्तेच्या हव्यासापोटी किळसवाणे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 03:39 IST

कर्नाटक हा ‘परमेश्वराचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो. पण येथील राजकारण किळसवाणे आहे. या निवडणुकीतील तिकीट वाटपात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे

राजदीप सरदेसाईकर्नाटक हा ‘परमेश्वराचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो. पण येथील राजकारण किळसवाणे आहे. या निवडणुकीतील तिकीट वाटपात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे येथील जनता राजकारण्यांऐवजी चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या क्रिकेटकडे अधिक आकर्षित होताना दिसते.मुख्यमंत्रिपदाचे तीन दावेदार आहेत. कर्नाटकला स्थिर सरकार देणारे काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या, भाजपाचे बी.एस. येदीयुरप्पा आणि एच.डी. देवेगौडा यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी. सिद्धरामय्या यांनी चार वर्षे आरामात काढल्यावर अचानक एका मागोमाग एक सवलती द्यायला सुरुवात केली. त्यांची प्रतिमाही उंचावली आहे.मुख्यमंत्रिपदाचा भाजपचा चेहरा असलेले बी.एस. येदीयुरप्पा यांचे वय ७५ वर्ष असल्याने त्यांना निवृत्त होऊन मार्गदर्शक मंडळात स्थान मिळवायला हवे होते. सत्ता असताना त्यांनी विश्वासार्हता गमावली होती. त्यांना तुरुंगवासही झाला. पण त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करताना भाजपची हतबलताच स्पष्ट झाली.तिसरा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असलेले एच.डी. कुमारस्वामी हे जनता दल (एस)चे उमेदवार आहेत. ते वोकालिंगा समाजाचे असून आपल्या व्यवसायात त्यांनी अनेक राजकारण्यांना भागीदार केलेले आहे. रेड्डींच्या खाण घोटाळ्याने भाजपचे कर्नाटकातील सरकार कोसळले होते. मात्र त्यांनाच पुन्हा भाजपात घेतल्याने मोदींच्या भ्रष्टाचाराविरोधाची पक्षानेच एकप्रकारे खिल्लीच उडविली आहे.देवभूमीत सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांनी मठांना आणि मंदिरांच्या पायऱ्या झिजवल्या. स्वामीदर्शनाचा सपाटा लावला. या परिस्थतीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळण्याची स्थिती उद्भवू शकते. त्यादृष्टीने देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्या निवासस्थानाबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. किंगमेकर्सचे महत्त्व वाढले आहे!

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८