शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्णन माफी मागू इच्छितात...’

By admin | Updated: May 13, 2017 00:05 IST

कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्णन बिनशर्त माफी मागू इच्छितात; परंतु न्यायालय रजिस्ट्री त्यांचा अर्ज स्वीकारत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्णन बिनशर्त माफी मागू इच्छितात; परंतु न्यायालय रजिस्ट्री त्यांचा अर्ज स्वीकारत नाही, असे कर्णन यांच्या वकिलाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. कर्णन यांच्या अटकेच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी विनंतीही त्यांच्या वकिलाने केली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती कर्णन यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ते अर्ज करू शकतात आणि न्यायाधीश उपलब्ध असताना त्यावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय पीठाने ९ मे रोजी कर्णन यांना कारावास ठोठावून कोलकाता पोलिसांना त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना कारावास ठोठावले गेलेले ते पहिले न्यायमूर्ती ठरले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावण्यापूर्वी कर्णन कोलकात्याबाहेर पडले. ते चेन्नईत राहत असल्याचे वृत्त आहे. कर्णन यांच्याविरुद्ध विवेकपूर्ण निर्णय-न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांच्याविरुद्ध विवेकपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले की, सातही न्यायमूर्ती एक विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठी एकत्र आले. तीन तलाकच्या मुद्यावर सुनावणी घेत असलेल्या इतर चार न्यायमूर्तींसोबत स्थानापन्न असताना खेहर यांनी ही टिपणी केली.