शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

पत्रकार परिषदेत कपिल मिश्रा पडले बेशुद्ध

By admin | Updated: May 14, 2017 12:54 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केलेले मंत्री कपिल मिश्रा आज सकाळी पत्रकार परिषदेतच बेशुद्ध पडले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केलेले मंत्री कपिल मिश्रा आज सकाळी पत्रकार परिषदेतच बेशुद्ध पडले.  गेल्या 5 दिवसांपासून ते केजरीवालांविरोधात उपोषणाला बसले आहेत. अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आल्याची शक्यता आहे. मिश्रांना सध्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण चक्कर येणापूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर पुन्हा गंभीर आरोप लावले. तसेच अरविंद केजरीवाल यांना थोडी जरी लाज वाटत असेल तर त्यांनी आज संध्याकाळपर्यंत राजीनामा द्यावा. जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर मी त्यांची कॉलर धरून त्यांना तिहार तुरुंगात टाकेन. तशी शपथ मी घेतली आहे असं त्यांनी ठणकावलं. 
 
केजरीवाल यांनी बनावट कंपन्यांच्या नावाने देणग्या वसूल केल्याचा त्यांनी आरोप केला.  केजरीवालांनी देशाचा विश्वासघात केला आहे. पक्षासाठी बनावट कंपन्यांच्या नावाने देणग्या वसूल केल्या तसेच पैशाची गरज नसतानाही लोकांकडून 10-10 रूपये वसूल करण्यात आले, त्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करण्यात आले. तसेच नोटबंदीच्या काळातही काळा पैसा पांढरा केला जात होता. अधिकाधिक बँक खाते अॅक्सिस बँकेतील असून याच खात्यातील पैसा नोटबंदीच्या काळात पांढरा केला जात होता आणि त्यांनी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली असं ते म्हणाले. 
 
काय आहे प्रकरण -
 
दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रूपये दिले असा सनसनाटी आरोप करून कपिल मिश्रांनी आज दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. जैन हे केजरीवालांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. दुसरीकडे आपने त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.  यावर प्रतिक्रिया देताना सिसोदिया म्हणाले, कपिल मिश्रांनी केलेले आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे असून हे सर्व आरोप निराधार आहे. प्रतिक्रिया देण्यासारखे हे आरोप नाही असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.  त्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असून कोणत्याही आधाराशिवाय हे आरोप करण्यात आल्याचं ते म्हणाले. मात्र, मिश्रा यांच्या या आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
   
शनिवारी दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. रविवारी सकाळी कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले. ‘परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही’ असे कपिल मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला. तसेच मी भ्रष्टाचारविरोधी पथकाला पत्र लिहिल्यानं मला हटवण्यात आलं असं ते म्हणाले.
 
याशिवाय केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांचं "डील" केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या गंभीर आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.