शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कन्हय्या देणार अटकेला आव्हान

By admin | Updated: February 21, 2016 01:08 IST

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करीत असलेला विद्यार्थी संघाचा नेता कन्हय्या कुमार दिल्ली पोलिसांसाठी मोठी अडचण निर्माण

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करीत असलेला विद्यार्थी संघाचा नेता कन्हय्या कुमार दिल्ली पोलिसांसाठी मोठी अडचण निर्माण करू शकतो. उच्च न्यायालयात सोमवारी जामिनासाठी याचिका दाखल करताना आपल्या अटकेलाही आव्हान देण्याचे कन्हय्याकुमार आणि त्याच्या वकिलांनी निश्चित केले आहे. जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणाबाजीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कन्हय्या कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती.

व्हिडिओ प्रयोगशाळेत...जेएनयूमधील देशविरोधी घोषणाबाजीच्या ज्या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला तो व्हिडिओ दिल्ली सरकारने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविला आहे. गेल्या ९ फेब्रुवारीला विद्यापीठ परिसरात झालेल्या या घोषणाबाजीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश सरकारने यापूर्वीच दिले आहेत. या कथित व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली आहे. मूळ चित्रणात त्याने देशविरोधी घोषणाबाजी केल्याचे दिसत नसल्याचे सांगण्यात येत आहे.पंतप्रधानांना आवाहनजेएनयू वाद हाताळण्याच्या सरकारच्या पद्धतीला विरोध करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राजीनामा देणारे विद्यार्थी नेते प्रदीप नरवाल यांनी पंतप्रधानांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सन्मान कायम राखण्याचे आवाहन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘त्या’ तिघांविरुद्ध लुकआऊट नोटीस...दिल्ली पोलिसांनी जेएनयूतील वादासंदर्भात तीन तरुणांविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावली आहे. हे तीन संशयित तरुण देशाबाहेर पडू नये यासाठी पोलिसांनी फॉरेन रिजनल रजिस्ट्रेशन आॅफिसला या प्रकरणाची माहिती दिली असून विमानतळ अधिकाऱ्यांना सतर्क करण्याची सूचनाही दिली आहे. तीनही तरुण जेएनयूचे विद्यार्थी असल्याचे समजते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेएनयूमधील घटनेचे हेच मुख्य सूत्रधार आहेत. विशेष म्हणजे ९ फेब्रुवारीपासून त्यांचे फोन बंद आहेत. तपासकर्त्यांनी यासंदर्भात घटनेचे साक्षीदार असलेल्या डझनावर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविले आहेत. १० जणांचा शोध...दुसरीकडे विशेष शाखेलाही विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या शोधमोहिमेत समाविष्ट करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी दहा लोकांचा शोध घेत आहेत.