कामठी... पालकमंत्री
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
मंदिराच्या विकास कामासाठी सहकार्य करणार
कामठी... पालकमंत्री
मंदिराच्या विकास कामासाठी सहकार्य करणारचंद्रशेखर बावनकुळे : श्रीसाईबाबा मंदिरात विविध कार्यक्रमकामठी : श्रीसाईबाबा मंदिराच्या विकास कामांसाठी सदैव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. आडापूल येथील साईबाबा मंदिरात आयोजित सत्कार व विविध कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आडापूल श्रीसाईबाबा मंदिर कमिटीच्यावतीने श्रीकृष्ण देवनाथ बाबा यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी खा. कृपाल तुमाने, नगर परिषदेचे उपाध्यक्ष रणजित सफेलकर, नगरसेवक अजय कदम, दीपक सिरीया, मीना सफेलकर, अजय अग्रवाल, पप्पू अग्रवाल आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते मंदिरात सेवा प्रदान करणाऱ्या मंडळींना गौरविण्यात आले. मंदिर कमिटीतर्फे तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले. प्रसंगी ना. बावनकुळे म्हणाले, श्रीसाईबाबा मंदिर सर्वधर्माचे प्रतीक असून मंदिराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यासाठी आपण कसोसीने प्रयत्न करणार आहे. प्रास्ताविक मंदिर कमिटीचे सुदाम राखडे यांनी केले. संचालन सुदेश अग्रवाल यांनी तर आभार उमाशंकर सिंग यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)