शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कळमेश्वर....

By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST

दत्तक ग्राम योजनेची आढावा सभा

दत्तक ग्राम योजनेची आढावा सभा
ग्रामस्थांची पाठ : जि.प. सदस्यांनी घेतले सोनपूर गाव दत्तक
कळमेश्वर : तालुक्यातील सोनपूर (आदासा) येथे नुकतीच दत्तक ग्राम योजनेबाबत आढावा सभा पार पडली. या सभेत विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्ष म्हणून जि. प. सदस्या अरुणा मानकर तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच राजुसा धुर्वे, सदस्य अनुसया कडू, चार्ज अधिकारी टिंगरे, ग्रामसेवक प्रवीण वाटकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, शिक्षण, समाजकल्याण, बालकल्याण आदी विभागामार्फत उपाययोजना आखण्याचे ठरविण्यात आले. तर येथील मुख्य समस्या असलेली भूमिगत पाईपलाईन असून ती संपूर्णत: नव्याने टाकण्याची गरज लक्षात घेता त्या दिशेने कार्य करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. आदासा हे गाव टेकडीच्या पायथ्याशी असून पावसाळ्यात टेकडीवरून खाली येणारे पाणी गावात शिरते. त्यामुळे संरक्षण भिंत बांधून पाणी गावाबाहेर काढणे अत्यावश्यक आहे. याबाबत शासन काय करू शकते, यावर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक चार्ज अधिकारी टिंगरे यांनी केले. आभार ग्रामसेवक प्रवीण वाटकर यांनी मानले.
विशेष म्हणजे, या सभेला स्थानिक ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु गावातील नागरिकांची उपस्थिती मात्र बोटावर मोजण्या इतकीच होती.
१६०६ लोकसंख्या असलेल्या सोनपूर (आदासा) या गावाचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक विकास अगोदरच साधल्या गेला आहे. यात १२ लाख रुपयांच्या निधीतून सांस्कृतिक भवन, दुकान गाळे, हौद आदी विकास कामे करण्यात आली. गावात अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण भरपूर प्रमाणात झाले. आदासा देवस्थान परिसरासोबतच गावाच्या विकासात आ. सुनील केदार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे जि.प. सदस्या अरुणा मानकर यांना हेच गाव दत्तक घेण्याची गरज का भासली, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या गावाव्यतिरिक्त धापेवाडा पंचायत सर्कलमधील परसोडी (वकील), मढासावंगी, पिपळा (किनखेडे), भडांगी, खानगाव, हरदोली, बोरगाव (बुजुर्ग), धूरखेडा, निळगाव, वरोडा, सावळी, वाढोणा, झुनकी आदी गावे विकासाच्या प्रतीक्षेत असताना दत्तक ग्राम घेताना अशा गावांकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा संतप्त सवालही नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)