शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

भाजयुमोतर्फे उमवित निदर्शने जेएनयूतील प्रकार: कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:03 IST

जळगाव : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार व त्याच्या साथीदारांनी राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ भाजयुमोतर्फे विद्यापीठ परिसरात निदर्शने करण्यात येऊन या प्रकरणी संबंधीतांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

जळगाव : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार व त्याच्या साथीदारांनी राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ भाजयुमोतर्फे विद्यापीठ परिसरात निदर्शने करण्यात येऊन या प्रकरणी संबंधीतांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
भारतीय जनता युवा मोार्चाचे जिल्हाध्यक्ष चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणा देत दिल्लीतील घटनेचा निषेध केला. तसेच राष्ट्रध्वज फडकावत राष्ट्रगीत म्हणण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सागर पाटील, रितेश लिंबडा, सचिन जोशी, सुहास जोशी, योगेश इंगळे, मिलिंद चौधरी, सौरभ चौधरी, मयुर भोळे, बॉबी चांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
----
जस्टीस फॉर पीपल्स सोसायटीतर्फे निवेदन
जस्टीस फॉर पीपल्स सोसायटीतर्फे दिल्लीतील घटनेचा निषेध करण्यात येऊन आंदोलनकर्त्यांचे समर्थन करणार्‍या कॉँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. कॉँग्रेसची मान्यता रद्द करावी अशी मागणी माजी सैनिक व संघटनेचे सचिव नगराज जनार्दन पाटील यांनी केली आहे. तसेच नेहरू विद्यापीठाची मान्यता काढून विद्यापीठही बंद करावे असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.