शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या ‘शेरा’च्या ताब्यात जस्टीन बीबर

By admin | Updated: May 10, 2017 17:23 IST

‘शेरा’च्या तावडीतून जस्टीन बीबर सुटला तरच तुम्हाला पाहाता येईल त्याची झलक, घेता येईल सही. जाणून घ्या त्याचे काही घरंदाज अंदाज.

मयूर पठाडे / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - वयाच्या बाराव्या वर्षीच सुपरस्टार बनलेल्या कॅनडियन पॉप सिंगर जस्टीन बीबरची केवळ एक झलक पाहण्यासाठी आज केवळ मुंबईकरच नाही तर संपूर्ण देशभरातील म्युझिक चाहते उत्सुक आहेत. मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत असलेल्या या कार्यक्रमासाठी तरुण- तरुणी अक्षरश: क्रेझी झालेले आहेत. पण आत्ता या घडीला तरी तो ‘शेरा’च्या ताब्यात आहे! त्याच्या तावडीतून सुटका झाली, तरच चाहत्यांना जस्टीन बेबरची झलक पाहता येईल, त्याला जवळून पाहाता येईल, त्याची भेट घेता येईल किंवा नशीब खूप म्हणजे खूपच जोरावर असलं तरच त्याची सहीदेखील घेता येईल.
 
आज वयाच्या 23 व्या वर्षीच कोट्यवधी डॉलर्सची कमाई करणारा जस्टीन बीबर फोर्बसच्या यादीतलाही ‘थर्टी अंडर थर्टी’ कॅटॅगिरीतला मोस्ट फेवरिट सेलिब्रिटी आहे. केवळ आपल्या गाण्यांच्या जोरावर तो किती कमाई करीत असेल? भारतीय रुपयांत सांगायचं तर गेल्या वर्षीची त्याची कमाई होती, 362 कोटी रुपये! 30 वर्षांच्या आतल्या सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींमध्ये जगात त्याचा सहावा क्रमांक लागतो. 
 
 
जस्टीन बीबरची केवळ एक झलक पाहण्यासाठी वेड्या झालेल्या तरुण-तरुणींच्या गराड्यापासून वाचवण्यासाठी जस्टिनभोवतीची सुरक्षाही मोठी कडक करण्यात आली आहे. 
 
 
आपल्या सुरक्षेसाठी जस्टीन बीबरनं स्वत:चे बॉडीगार्ड तर सोबत आणले आहेतच, पण त्याच्या खास सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवली आहे माहीत आहे? ‘शेरा’ हा सलमानखानचा गेल्या वीस वर्षांपासूनचा खास बॉडीगार्ड आहे. जस्टीन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारीही त्याच्यावरच सोपवण्यात आली आहे.
 
सलमानच्या चाहत्यांसाठी ही आणखीच खुशीची बात आहे. मात्र जस्टीन बीबरचे नखरे सांभाळण्याची फार मोठी कसरत त्याच्या आजूबाजूला असणार्‍यांना करावी लागणार आहे. केवळ आपल्या गाण्यांमुळेच नाही, तर त्याच्या चित्रविचित्र गोष्टींमुळेही तो कायम चर्चेत असतो. त्यामुळे अनेकदा त्यानं वाद ओढवून घेतले आहेत. आताही मुंबईतल्या कार्यक्रमासाठी त्यानं ज्या मागण्या केल्या होत्या, त्यानं अनेकांवर तोंडात बोटं घालायची वेळ आली. 
 
जस्टीन बीबरच्या मागण्या आणि शाही थाट
 
 
1- स्टेडियमवर उतरण्यासाठी खास हेलिकॉप्टर
2- 24 तास झेड प्लस सिक्युरिटी
3- राहाण्यासाठी फाईव्ह स्टार दोन हॉटेल्स
4- जस्टीन बीबरसाठी दोन रोल्स राईस कार्स
5- त्याच्याबरोबरच्या मेंबर्ससाठी दहा सेदान कार्स आणि दोन वोल्वो बस
-अशा अनेक गोष्टी.
जस्टीन बीबरसाठी पागल झालेल्या लोकांना आणि जस्टीन बीबरलाही खूश करायचं तर आयोजकांपुढे दुसरा पर्याय तरी काय आहे?