शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

न्या. कर्नन यांना सहा महिन्यांचा कारावास

By admin | Updated: May 10, 2017 01:13 IST

देशाच्या सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या आठ न्यायाधीशांना गुन्हेगार ठरवून त्यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या आठ न्यायाधीशांना गुन्हेगार ठरवून त्यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावणारे कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश न्या. चिन्नास्वामी स्वामिनाथन तथा सी. एस. कर्नन यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. अशा प्रकारे पदावर असताना तुरुंगात जावे लागणारे न्या. कर्नन हे देशातील पहिले हायकोर्ट न्यायाधीश ठरले आहेत.न्या. कर्नन यांनी सहकारी न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे बेछूट आणि निराधार करून तसेच सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशांनाही धाब्यावर बसून एकूणच न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेस बट्टा लावला. त्यामुळे त्यांना न्यायालयीन बेअदबीबद्दल (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) दोषी ठरवून सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांच्या विशेष घटनापीठाने न्या. कर्नन यांना शिक्षा ठोठावली.कोलकत्याच्या पोलीस आयुक्तांनी न्या. कर्नन यांना तात्काळ अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी, असाही आदेश दिला गेला. त्यानुसार सायंकाळी पोलीस न्या. कर्नन यांच्या तेथील शासकीय निवासस्थानी गेलेही. पण सरन्यायाधीशांना शिक्षा ठोठावणारा आदेश सोमवारी दिल्यानंतर न्या. कर्नन चेन्नईला गेले असून तेथे ते ११ मेपर्यंत राहणार असल्याचे समजते.न्यायालयाने ही अवमानना कारवाई सुरु करून नोटीस काढल्यानंतरही न्या. कर्नन हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध वॉरन्ट काढले गेले होते. त्यांनंतर ते फक्त एका तारखेला आले व नंतर त्यांनी कोलकत्यात बसून सर्वोच्च न्यायालय व त्यांच्या न्यायाधीशांविरुद्ध निरनिराळे आदेश देणे सुरु केले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोणतेही न्यायिक अथवा प्रशासकीय काम करण्यास मनाई करूनही त्यांनी हा संघर्षाचा पवित्रा कायम ठेवला.प्रसिद्धीमाध्यमांना मनाई-न्या. कर्नन यांच्याकडून न्यायिक काम काढून घेतल्यापासून ते राहत्या घरी कोर्ट भरावायचे, त्यात चित्रविचित्र आदेश काढायचे आणि माध्यमांना बोलावून त्याच्या प्रती द्यायचे. मुळात न्या. कर्नन यांचे हे प्रकरण हेच न्यायव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारे आहे. त्यातून न्या. कर्नन यांच्या या विक्षिप्त आदेशांच्या ठळक प्रसिद्धीने न्यायव्यवस्थेची अब्रू पार धुळीला मिळाली. हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने यापुढे न्या. कर्नन यांच्या कोणत्याही आदेशांना वा वक्तव्यांना प्रसिद्धी देण्यास प्रसिद्धी माध्यमांना मनाई केली. परंतु स्वत: न्या. कर्नन आता तुरुंगात जाणार असल्याने अशी मनाई करण्याचे प्रयोजन काय हे सर्वोच्च न्यायालयाचे सविस्तर निकालपत्र न मिळाल्याने लगेच स्पष्ट झाले नाही. वैद्यकीय तपासणीस दिला होता नकार-काही दिवसांपूर्वी, न्या. कर्नन स्वत:चा कायदेशीर बचाव करण्यास सक्षम आहेत का हे जोखण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. न्या. कर्नन यांनी वैद्यकीय तपासणी करून न घेतल्याने त्याचा अहवाल आला नाही.न्या. कर्नन येत्या ११ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वी महिनाभर आणि त्यानंतर आणखी पाच महिने तुरुंगात राहण्याची नामुष्की त्यांच्यावर येईल.