नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणाºया याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या, शुक्रवारी सुनावणी घेतली जाणार आहे.नागपूर येथे १ डिसेंबर २०१४ रोजी हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला. तशी इस्पितळातील नोंद आहे. ते आदल्या दिवशी एका सहकाºयाच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या पुढे चालू असलेला खटल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.न्या. लोया यांच्या बहिणीने न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने मीडियाकडे संशय व्यक्त केल्याननंतर हे प्रकरण पुढे आले होते. महाराष्टÑातील पत्रकार बी.आर.लोणे यांची याचिका विचारार्थघेऊन सरन्यायाधीश दीपकमिश्रा आणि न्या. ए.एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूडयांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.हायकोर्टातही याचिकामुंबई वकील संघाने ८ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्या. लोया यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.न्या. एस.सी. धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांचे खंडपीठाने या याचिकेवर २३ जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले होते.
न्या. लोया मृत्यूप्रकरणी आज होणार सुनावणी- सर्वोच्च न्यायालय; बहिणीने व्यक्त केली शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:47 IST