शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

जस्ट चिल्ड चिल्ड...

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

पारा ६.७ :

पारा ६.७ :
उपराजधानीत शीतलहर : २४ तासात पारा ४ अंशांनी घसरला
नागपूर : सरत्या वर्षाला निरोप देताना उपराजधानी गारठली आहे. नागपुरात शीतलहर सुरू झाली आहे. शनिवारी नागपूरचा पारा सामान्यापेक्षा ६ अंशाने घसरत ६.७ अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड राहिले. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात पारा तब्बल ४ अंशानी घसरला. पुढील २४ तासात पारा ७ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शीतलहर आहे. दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, सायक्लोनिक सर्क्युलेशन त्याच्याशी जोडल्या गेले आहे. यासोबतच उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड हवेमुळे तापमानात अचानक घट आली आहे. विदर्भात अकोला (८.६) वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १०.१० अंशांवर आहे. वाशीम येथे सर्वाधिक १५ अंश से. तापमान नोंदविल्या गेले.
नागपुरात आकाश नीरभ्र आहे. कमाल तापमान सामान्यापेक्षा २ अंशांनी कमी म्हणजे २५.७ अंश से. नोंदविण्यात आले आहे. आज दिवसभर थंड हवा सुरू होती. सकाळी धुके दाटले होते.

चौकट...
दुसरा सर्वाधिक थंड दिवस
यावर्षी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडत आहे. १९ डिसेंबर रोजी किमान तापमान ६.६ अंशांपर्यंत आले होते. तो या मोसमातील सर्वात थंड दिवस होता. शनिवारी किमान तापमान ६.७ अंश से. नोंदविल्या गेले. हा मोसमातील दुसरा सर्वाधिक थंड दिवस राहिला. नव्या वर्षात तापमानात आणखी घट येण्याची शक्यता आहे.