शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

बंदमुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत, यासिन मलिक, सय्यद गिलानी, मिरवाईज स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 04:21 IST

रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येच्या निषेधार्थ फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी काश्मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले.

श्रीनगर : रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येच्या निषेधार्थ फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी काश्मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले. या बंदमध्ये निदर्शने करून वातावरण आणखी बिघडवू नये यासाठी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे (जेकेएलएफ) प्रमुख यासिन मलिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हुरियत कॉन्फरन्सचा अध्यक्ष मिरवाईझ उमर फारूख यालाही स्थानबद्धतेत ठेवले आहे.जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती सरकार पडल्यानंतर लागू झालेल्या राज्यपाल राजवटीत दहशतवाद्यांबरोबरच फुटीरतावादी नेत्यांवरही कडक कारवाई करण्यात येत आहे. मिरवाईझ फारूखना निगिन येथील निवासस्थानी स्थानबद्धतेत ठेवण्यात आले असून, यासिन मलिकला कोठीबाग पोलीस ठाण्यात आणून स्थानबद्ध केले. हुरियत कॉन्फरन्सच्या गिलानी गटाचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी हे याआधीच स्थानबद्धतेत आहेत.फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे काश्मीर खोºयातील जनजीवन विस्कळीत झाले. श्रीनगर येथील बहुसंख्य दुकाने, पेट्रोल पंप तसेच व्यावसायिक आस्थापने बंद होती. तसेच शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता व वाहतुकीवरही परिणाम झाला होता. काश्मीरमधील रेल्वेसेवाही सुरक्षिततेसाठी आजच्या दिवस बंद ठेवली होती. (वृत्तसंस्था)>पँथर्स पार्टीचे धरणेमेहबुबा मुफ्ती यांचे सरकार पडल्यानंतर नवे सरकार स्थापन करण्यासाठी होणारा घोडेबाजार लक्षात घेता या राज्याची विधानसभा तत्काळ बरखास्त करावी, या मागणीसाठी जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी (जेकेएनपीपी)च्या कार्यकर्त्यांनी जम्मू येथे गुरुवारी धरणे धरले होते. इतर पक्षांचे आमदार फोडून पुन्हा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होईल, अशी भीती पँथर्स पार्टीने व्यक्त केली. याआधी नॅशनल कॉन्फरन्सनेही हीच भीती व्यक्त केली आहे. भाजपाच असे करेल, असे कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले होते.