शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जुलै, आॅगस्टमध्ये मात्र कमी पाऊस

By admin | Updated: June 29, 2015 00:04 IST

आगामी दोन महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.

नवी दिल्ली : जूनमध्ये बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत सामान्यापेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवतानाच कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.जुलै व आॅगस्टमध्ये अनुक्रमे ८ ते १० टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे आयएमडीचे महासंचालक लक्ष्मणसिंग राठोड यांनी म्हटले. जून महिन्यात पेरणीला सुरुवात होते. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत तशी परिस्थिती राहणार नसल्यामुळे आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. काही भागांत मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे जलाशये भरली आहेत. ‘चारधाम’ यात्रा ३० जूनपर्यंत स्थगितडेहराडून : संततधार पावसामुळे रस्ते आणि पूल कोसळल्यानंतर सरकारने चारधाम यात्रा ३० जूनपर्यंत स्थगित केली. हेमकुंडच्या मार्गासह बद्रीनाथ, केदारनाथ व अन्य ठिकाणी किमान दहा हजारांवर यात्रेकरू अडकून पडले आहेत. दरम्यान, तेथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर यात्रेकरू कमालीचे नाराज आहेत व यात्रेकरूंजवळचे पैसेही संपलेले आहेत. तेथील एटीएममध्येही पैसे भरण्यात येत नसल्याची माहिती आहे.> पावसामुळे बद्रीनाथ यात्रा व चलोली जिल्ह्यातील हेमकुं ड साहिब यात्रा ठप्प पडली आहेस्कायमेटचा अंदाज> स्कायमेट या खासगी हवामानविषयक संस्थेने जुलै महिन्यात सामान्यापेक्षा जास्त (१०४ टक्के), आॅगस्टमध्ये सामान्य (९९ टक्के), तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे अपुरा पाऊस मानला जातो. ९० ते ९६ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी तर १०४ ते ११० टक्के म्हणजे सामान्य तर त्याहीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी ठरते. आयएमडीने यावर्षी ८८ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला असून, विशेषत: वायव्य भारतात मान्सून अपुरा राहील. यावर्षी जूनमध्ये सामान्यापेक्षा २८ टक्के जास्त पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांना सल्ला> हवामानाचा काळजीपूर्वक अभ्यास करून पिकांची निवड करा. ज्या भागात १०० ते ११० मि.मि. पाऊस पडतो त्या ठिकाणी ६० ते ७० मि.मि. पाऊस झाला असेल, तर धानाऐवजी (भात) मक्याच्या पिकाची निवड करावी, असा सल्ला राठोड यांनी दिला.