शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्तींना कामबंदी!

By admin | Updated: February 9, 2017 02:13 IST

मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांविरुद्ध न्या. सी. एस. कर्नन यांनी लिहिलेल्या अपमानास्पद पत्रांचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांविरुद्ध न्या. सी. एस. कर्नन यांनी लिहिलेल्या अपमानास्पद पत्रांचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने न्या. कर्नन यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाने न्या. कर्नन यांना व्यक्तिगतरित्या हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याविरुद्ध अवमानसंबंधी कारवाई का सुरू करू नये अशी विचारणाही करण्यात आली आहे. न्यायिक आणि प्रशासकीय कार्य करण्यापासूनही त्यांना तात्काळ रोखण्यात आले आहे. न्या. कर्नन यांना त्यांच्या वर्तनामुळे मद्रास उच्च न्यायालयातून कलकत्ता उच्च न्यायालयात पाठविण्यात आले आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या पीठाने म्हटले आहे की, न्या. कर्नन यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात यावी. याचे उत्तर त्यांनी १३ फेब्रुवारीपर्यंत द्यावे. या न्यायाधीशात न्या. दीपक मिश्रा, न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. एम. बी. लोकुर, न्या. पी.सी. घोष आणि न्या. कुरियन जोसेफ यांचा समावेश आहे. न्या. कर्नन यांनी आपल्याजवळील सर्व फाइल्स कलकत्ता उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्या. कर्नन यांच्या वर्तनाचा उल्लेख केला. ही कृती न्याय प्रशासन व्यवस्थेला बदनाम करणारी असल्याचे ते म्हणाले. त्यांनी खंडपीठाला विनंती केली की, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश देण्यात यावेत की, संबंधित न्यायाधीशांना न्यायिक आणि प्रशासकीय कार्य करण्यापासून रोखण्यात यावे. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, आम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध प्रथमच कारवाई करणार आहोत. असे करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय आहे प्रकरण? न्या. कर्नन यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांविरुद्ध तिरस्कार व्यक्त करणारे पत्र लिहिले होते. सरन्यायाधीश, पंतप्रधान यांना संबोधित करून हे पत्र लिहिले होते. न्या. कर्नन यांना या वर्तनामुळे मद्रास उच्च न्यायालयातून कोलकाता उच्च न्यायालयात पाठविण्यात आले. आता त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू होत आहे. पंतप्रधानांना लिहिले होते पत्र जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. यात म्हटले होते की, नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे. पण, न्यायपालिकेत मनमानीपणे आणि कुणालाही न घाबरता भ्रष्टाचार होत आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. यात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या विद्यमान २० पेक्षा अधिक न्यायाधीशांचे नावे देण्यात आली होती. असे हे वाद न्या. कर्नन आणि वाद यांचे नाते तसे जुने आहे. २०११ मध्ये त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या आपल्या सहकारी न्यायाधीशांविरुद्ध जातीवाचक उद्गार काढल्याची तक्रार दिली होती. २०१४ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत ते तत्कालिन मुख्य न्यायाधीशांच्या केबिनमध्ये घुसले होते आणि वाद घातला होता.