शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश नेमणुकीचा तिढा अखेर सुटला

By admin | Updated: March 15, 2017 21:49 IST

न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमचा वाद अखेर संपुष्टात आला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - न्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं न्यायाधीशांच्या नेमणुकीचा प्रस्ताव म्हणजे मेमोरँडम ऑफ प्रोसिजर (MOP)ला अंतिम स्वरूप दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेजिअमने नॅशनल सिक्युरिटी क्लॉजला जोडण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता न्यायाधीशांच्या नेमणुकीत कोणताही वाद होणार नाही. गेल्या काही वर्षांपासून कॉलेजिअमवरून न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यात वाद सुरू आहे. केंद्र सरकार न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या पात्रतेत याला सामील करून घेण्यासाठी आग्रही होते. मात्र कॉलेजिअमनं याला विरोध केला होता. मात्र कॉलेजिअमच्या समितीनं याला सहमती दर्शवली आहे. कॉलेजियममध्ये मुख्य न्यायाधीशांशिवाय न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश जे. चेलामेश्वर, न्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश मदन बी लोकूर यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमनं यासाठी 7 बैठका घेतल्या आहेत आणि त्यानंतरच सर्वांच्या सहमतीनं मेमोरँडम ऑफ प्रोसिजर (MOP)ला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. याचा फायदा डेटाबेस बनवण्याबरोबरच न्यायाधीशांच्या नियुक्तीत कॉलेजिअमची मदत करण्यासाठी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये एक सचिवालय बनवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तत्पूर्वी 12 फेब्रुवारीला मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर म्हणाले होते की, मेमोरँडम ऑफ प्रोसिजर (MOP)ला या महिन्याच्या शेवटी मंजुरी देण्यात येईल. मुख्य न्यायाधीशांनी एकमत झाल्याचे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलण्याचे निर्देश देण्यासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर माहिती देताना मुख्य न्यायाधीश खेहर यांनी हा निर्णय दिला आहे.