नवी दिल्ली : मूळचे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील असलेले ज्येष्ठ वकील उदय उमेश लळीत यांच्यासह गुवाहाटी, झारखंड आणि मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी रुजू झाले.सस एक पद रिक्त आहे.स्वतंत्र भारतात थेट वकिलांमधून नेमले गेलेले न्या. लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे सहावे न्यायाधीश आहेत. गेल्याच महिन्यात न्या. रोहिंग्टन नरिमन यांचीही थेट वकिलांमधून नेमणूक झाली होती. त्याआधी न्या. ए. एम. सिक्री (१९६३), न्या. एस. सी. रॉय (१९७१), न्या. कुलदीप सिंग (१९८८) आणि न्या. संतोष हेगडे (१९९९) यांच्या अशा नेमणुका झाल्या होत्या.न्या. लळीत १९८६ पासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत होते. त्यांना सुमारे आठ वर्षांचा कार्यकाळ मिळेल. न्या. एन. व्ही. रमणा २०२२ मध्ये निवृत्त झाल्यावर न्या. लळीत काही महिन्यांसाठी भारताचे सरन्यायाधीशही होऊ शकतील. बुधवारी नव्याने नेमणूक झालेल्या इतर न्यायाधीशांपैकी न्या. अभय मनोहर सप्रे गुवाहाटी, न्या. श्रीमती आर. भानुमती झारखंड तर न्या. प्रफुल्ल चंद्र पंत मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्या. भानुमती या सर्वोच्च न्यायालयावर जाणाऱ्या तामिळनाडूच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)
उदय लळीत सुप्रीम कोर्टात न्यायाधीश
By admin | Updated: August 14, 2014 03:42 IST