शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकाराच्या मृत्यूने भाजपची कोंडी?

By admin | Updated: July 5, 2015 23:36 IST

टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. अक्षयसिंग यांच्या मृत्यूच्या निमित्ताने विविध मुद्दे उपस्थित झाले असल्यामुळे योग्य तपास करून सर्व प्रकारचा संशय दूर केला जावा.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) प्रवेश आणि भरती घोटाळ््याच्या मुळाशी जाऊ पाहणाऱ्या दिल्लीच्या टीव्ही टुडे वृत्तवाहिनीचे शोध पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूने सत्ताधारी भाजपची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अक्षय यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, असे मत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले आहे. पण ही अतिशय धक्कादायक बाब असून या घोटाळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का बाळगून आहेत, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंग यांनी केला आहे.शनिवारी मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यात अक्षय यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर ४८ तासांच्या आत याच घोटाळ््याचा तपास करणाऱ्या डॉ.शर्मा यांचा मृत्यू झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घोटाळ्यात नाव असलेली विद्यार्थिनी निर्माता दामोर हिचा मृतदेह ७ जानेवारी २०१२ रोजी उज्जैन जिल्ह्यात रेल्वे रूळावर आढळून आला होता. दोनच दिवसांपूर्वी ३८ वर्षीय अक्षयसिंग यांनी तिच्या मातापित्याची मुलाखत घेतली होती. अक्षयसिंग यांच्यावर रविवारी पूर्व दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन, दिग्विजयसिंग, रणदीपसिंग सूर्जेवाला आदी नेते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)--------------टीव्ही पत्रकार अक्षयसिंग यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. अक्षयसिंग यांच्या मृत्यूच्या निमित्ताने विविध मुद्दे उपस्थित झाले असल्यामुळे योग्य तपास करून सर्व प्रकारचा संशय दूर केला जावा. - अर्थमंत्री अरुण जेटली --------------मोदींचे मौन धक्कादायक- काँग्रेस > अक्षयसिंग यांचा मृत्यू एक पत्र लिहून केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी करणे ही मुख्यमंत्री चौहान यांच्यासाठी अतिशय साधी बाब आहे. व्यापमं घोटाळा असो की छत्तीसगडमधील तांदूळ घोटाळा. > राजस्थानमध्ये म्हणा की केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्र्यांबाबत जे घडत आहे ते पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन सोडायला तयार नाहीत. या सर्व घोटाळ्यांना त्यांचा आतून पाठिंबा असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.