नवी दिल्ली : जेएनयूमधील देशविरोधी घोषणांमुळे वातावरण तापले असून, सोमवारी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमारला न्यायालयात आणण्याआधीच भाजपा समर्थक काही वकिलांनी विद्यार्थी व पत्रकारांना मारहाण केली. ‘हिन्दुस्तान जिंदाबाद, जेएनयू को बंद करो’ अशा घोषणा देत काही वकिलांनी विद्यार्थी व पत्रकारांना मारहाण केली. गृहसचिव राजीव महर्षी यांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेत, कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपा यांच्यात सोमवारी चिखलफेक सुरू राहिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली फुटीरवाद्यांना मोकळीक देऊन काँग्रेसला आणखी एक फाळणी हवी आहे का, अशा शब्दांत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राहुल यांनीही जोरदार पलटवार करीत, भाजपा फुटीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. जेएनयू प्रकरणावरून माकपाचे नेते सीताराम येचुरींना धमकी आली असून, त्याची चौकशी पोलीस करीत आहेत.
जेएनयू वाद चिघळला
By admin | Updated: February 16, 2016 03:54 IST