शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय परिस्थिती बदलली तरीही लष्करी कारवाया थांबणार नाहीत- लष्करप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 18:17 IST

काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली: काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बदलली असली तरी येथील लष्करी कारवायांमध्ये कोणताही फरक पडणार नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आली तरी लष्कराला कोणताही फरक पडेल, असे मला वाटत नाही. आमच्या कारवायांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप केला जात नाही. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील लष्करी कारवाया पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. तसेच केंद्र सरकारने रमझानमध्ये शस्त्रसंधी केल्यामुळेच लोकांना शांततापूर्ण वातावरणात नमाज अदा करता आली. मात्र, ही शस्त्रसंधी अधिक काळ सुरु राहिली असती तर दहशतवाद्यांच्या कारवायांनी वेग आला असता. त्यामुळे रमजाननंतर शस्त्रसंधी मागे घेण्यात आली, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. काश्मीरमध्ये भाजपाने नुकताच पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. रमजानच्या काळातील शस्त्रसंधीचा मुद्दा युती तुटण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक होता. मात्र, पीडीपीने शस्त्रसंधीची ही मुदत आणखी काही काळ वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपाने या मागणीला केराची टोपली दाखवत लष्कराला काश्मीरमध्ये पुन्हा फ्री हँड दिला होता. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतJammu Kashmirजम्मू-काश्मीर