शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

जिंकली बंगाली अस्मिता! व्हीलचेअरवर रोड शो, खूर्चीवर बसूनच प्रचारसभा

By shrimant maney | Updated: May 3, 2021 01:46 IST

भाजपकडून असभ्य भाषेत होणारा प्रचार ममता बॅनर्जी यांच्या पत्थ्यावर

श्रीमंत मानेदिल्लीवरून चौखूर उधळलेले नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या अश्वमेधाचे वारू अखेर हुगळीच्या काठावर बंगालच्या वाघिणीने रोखले. वाघीणही कशी तर नंदीग्राममध्ये प्रचाराच्या सुरवातीलाच गर्दीत जखमी झालेली. तो जखमी डावा पाय घेऊनच जवळपास दोन महिने ममता बॅनर्जींनी बंगाल पिंजून काढला. व्हीलचेअरवर रोड शो केला. खूर्चीवर बसूनच प्रचारसभा घेतल्या. मोदी व शहा हे दोघे सर्वशक्तिमान नेते. त्यांचे आक्रमण असे जोरदार की प्रतिस्पर्ध्यांचा विध्वंसच होणार. त्यामुळेच देशाचा एखाददुसरा कोपराच त्यांनी पादाक्रांत होण्यापासून वाचला आहे. यावेळी ते नेते-कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन पूर्ण ताकदीनिशी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत पश्चिम बंगालवर तुटून पडले. प्रत्येक मतदारसंघ इंच इंच लढविला. भाजपचे जुने व तृणमूल व अन्य पक्षातून आलेले नवे असे सगळे मिळूनही थोडे उमेदवार कमी पडताहेत वाटले तर एक एक जागा महत्त्वाची असल्याने लोकसभा व राज्यसभेच्या मिळून पाच खासदारांनाही मैदानात उतरविले. त्यापैकी लोकसभा जिंकणारे विधानसभेत पराभूत झाले. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे गृहराज्य जिंकणे भाजपला जमलेच नाही.

ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा विजय सोपा नव्हता. डझनावारी नेते सोडून गेल्याने पक्ष खिळखिळा झाला होता. थोडीबहुत आशा होती ती पक्षाच्या संघटनेकडून. कॉलेज जीवनापासून आक्रमक नेत्या अशी प्रतिमा असलेल्या, आक्रमण हाच बचावाचा मार्ग मानणाऱ्या ममतांनी लोकभावनेची नाडी, कार्यकर्त्यांची मानसिकता ओळखली. बड्यांना ललकारणारे नेहमीच समाजाचे हीरो बनतात, हे ओळखले. शेतजमिनीसाठी संघर्षामुळे ज्या नंदीग्रामने त्यांचे नेतृत्त्व फुलविले, तिथेच शुभेन्दू अधिकारी यांच्या रूपाने बंड झाले. त्या भागात प्रचंड प्रभाव असलेले अधिकारी घराणे विरोधात गेले. तेव्हा, भवानीपूर हा जुना परंपरागत मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला. अन्य कुणी नेता दोन जागांवर लढला असता. ममता बॅनर्जी यांनी हे टाळले. हा विजयाचा पहिला टप्पा होता.

जखमी पाय, बर्म्युडा, दीदी ओ दीदी, अशा असभ्य भाषेत भाजपकडून होणारा प्रचार ममता बॅनर्जी यांच्या पत्थ्यावर पडला. महिलांमध्ये सहानुभूती निर्माण झाली. भाजपने ममता बॅनर्जी व तृणमूलवर हल्ले वाढविताच बंगाली अस्मिता आकार घेऊ लागली. लोकांशी चर्चा करताना ती सूक्ष्म लाट जाणवत होती. ढोकळा-फाफडा नको, आपला रसगुल्लाच बरा, अशी त्या अंडरकरंटची भाषा होती.

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर दिल्ली टक्कर या निमित्ताने गायपट्ट्याच्या बाहेर हिंदुत्त्वाच्या मुद्याचाही कस लागला. जय श्रीरामच्या घोषणेसह धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपकडून झाला. तेव्हा आपल्या मुख्यमंत्री धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर भाजपचे आव्हान स्वीकारताहेत हे पाहताच एरव्ही डावे पक्ष किंवा काँग्रेसचा परंपरागत म्हणविला जाणारा मतदार पूर्ण ताकदीने ममता बॅनर्जींच्या पाठीशी उभा राहिला. त्यात अल्पसंख्यांक मुस्लीम मतदारांसोबत सहिष्णू हिंदू मतदारही मोठ्या प्रमाणावर होते हे निकालाने स्पष्ट झाले.

तृणमूलमधून भाजपमध्ये इतके नेते आले की मूळ भाजपचा चेहराच हरवला. त्यामुळे जुने भाजप कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यात पुन्हा ज्यांचे तृणमूलमध्ये एकमेकांशी पटत नव्हते ते भाजपमध्ये आल्यानंतर पुढे काय होणार, याचीही चर्चा होऊ लागली.

n ममता बॅनर्जींचा हा विजय २०१६ पेक्षा मोठा व सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता ऐतिहासिक आहे. या निवडणुकीत आक्रमण कसे करावे याचा वस्तुपाठ भाजपने देशासमोर ठेवला तर भाजपशी, विशेषत: मोदी-शहा यांच्याशी कसे त्यांच्याच शैलीत लढावे, कसे त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर द्यावे, हे ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले.

n तुम्ही सुसंस्कृत राजकारण व सभ्यता सोडणार असाल तर आम्हीही तसेच करू. तुम्ही साम, दाम, दंड भेद वापरणार असाल तर आमचे हात बांधलेले राहणार नाहीत, हा या राजकीय संघर्षातील स्पष्ट संदेश आहे.

शेतजमिनीसाठी संघर्षामुळे ज्या नंदीग्रामने त्यांचे नेतृत्त्व फुलविले, तिथेच शुभेन्दू अधिकारी यांच्या रूपाने बंड झाले. त्या भागात प्रचंड प्रभाव असलेले अधिकारी घराणे विरोधात गेले. तेव्हा, भवानीपूर हा जुना परंपरागत मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला. हाच त्यांचा पहिला पिजय.

बंगालला ढोकळा-फाफडा नको, आपला रसगुल्ला प्यारा

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूक