शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिंदल, भटकळच्या जिवाला धोका

By admin | Updated: July 8, 2015 23:40 IST

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार लष्कर- ए- तय्यबाचा अतिरेकी अबू जिंदल याच्या जीवाला धोका असल्याची भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली असल्याची माहिती राष्ट्रीय

नवी दिल्ली : मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार लष्कर- ए- तय्यबाचा अतिरेकी अबू जिंदल याच्या जीवाला धोका असल्याची भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्ली न्यायालयाला दिली आहे. इंडियन मुजाहिदीनचा सह संस्थापक मोहम्मद अहमद सिद्दीबापा ऊर्फ यासीन भटकळ याने पोलीस आपल्याला जिवे मारतील, अशी भीती व्यक्त करतानाच २४ तास निगराणी ठेवण्याची विनंती विशेष न्यायालयाकडे केली आहे.अबूला कारागृहातून हलविताना त्याच्या प्रतिस्पर्धी गटाकडून अपहरण आणि हत्या केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करणारा अर्ज एनआयएने जिल्हा न्यायाधीश अमरनाथ यांच्याकडे सादर केला आहे. तो सध्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात असून त्याच्याविरुद्ध वारंवार वॉरंट जारी होऊनही त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेले नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केलेल्या विनंतीनुसार तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मे २०१३ मध्ये अबूला न्यायालयात व्यक्तिश: हजर न करण्याबाबत ठराव पारित केला होता. त्याला अबूने आव्हान दिले असता मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता, याकडे एनआयएने लक्ष वेधले. जिंदलचा खटला तातडीने निकाली काढावा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आधारे सुनावणी केली जावी, अशी विनंतीही या तपास संस्थेने केली. (वृत्तसंस्था)