शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिगरबाज...त्या जवानांने कुलुपाने बर्फ फोडून मृत्यूवरही केली मात

By admin | Updated: January 27, 2017 19:20 IST

ळगावमधील मेजर श्रीहरी कुगजी यांनी केला आहे. १५ फूट बर्फाखाली अडकलेल्या कुगजी यांनी कुलुपाने बर्फ फोडून मृत्यूवरही मात केली.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात 25 फूट बर्फाखाली गाडले गेलेल्यानंतरही सहा दिवसांनंतर बाहेर आलेले जिगरबाज लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांनी मृत्यूशी दिलेली झुंज आपल्याला माहीत आहेच. आज त्यांची पुन्हा आठवण करून देणारा पराक्रम बेळगावमधील मेजर श्रीहरी कुगजी यांनी केला आहे. १५ फूट बर्फाखाली अडकलेल्या कुगजी यांनी कुलुपाने बर्फ फोडून मृत्यूवरही मात केली.जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिमवृष्टी होतेय. मेजर श्रीहरी कुगजी याच भागात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी हिमस्खलनामुळे छावणीचं छप्पर कोसळलं आणि ते १५ फूट बर्फाखाली अडकले. सुटकेचा मार्गच दिसत नव्हता. ते अशा ठिकाणी होते की बचाव पथकाच्या दृष्टीस पडणंही अशक्य होतं. पण जिगरबाज कुगजी यांनी हार न मानता लढायचं ठरवलं. बर्फ फोडण्यासाठी काही हाती लागतंय का, यासाठी झटापट सुरू केली. तेव्हाच त्यांच्या हाती ट्रँकेचं कुलूप लागलं आणि त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी कुलुपाने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचं एकेक बोट बर्फाबाहेर येऊ लागलं. साधारण तीन तास ते झगडत होते. त्याला नशिबाची साथ मिळाली आणि बचाव पथकाला कुगजी यांची बोटं दिसली. त्यानंतर, सहकारी जवानांनी बर्फ फोडून त्यांना बाहेर काढलं आणि या जिद्दीपुढे मृत्यूनं गुडघे टेकले. दरम्यान, श्रीहरी कुगजी अजूनही सोनमर्गमध्येच आहेत. रस्त्यावर चार फूट बर्फाचा थर असल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद आहे आणि हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरही तिथे पोहोचू शकत नाहीए. परंतु, त्यांचा पराक्रम बेळगावपर्यंत पोहोचला असून या धाडसाला सगळेच सलाम करत आहेत.