फौजदार महिलेचे घर फोडून रिव्हॉल्वरसह दागिने लंपास
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
पुणे : सूस रस्त्यावरील महालक्ष्मी हाईट्स या सोसायटीतील फ्लॅटचे कुलुप बनावट किल्लीने उघडून फौजदार महिलेच्या सरकारी रिव्हॉल्वरसह सोन्याच्या २ बांगड्या चोरांनी लंपास केल्या. स्मिता पाटील (वय २६ शिवालय सोसायटी, साई चौक, सूस रस्ता, पाषाण ) यांनी याबाबत फिर्याद केली आहे.१९ तारखेच्या दुपारी साडेचार पासून २१ तारखेच्या सकाळपर्यंत त्यांचा फ्लॅट कुलुपबंद ...
फौजदार महिलेचे घर फोडून रिव्हॉल्वरसह दागिने लंपास
पुणे : सूस रस्त्यावरील महालक्ष्मी हाईट्स या सोसायटीतील फ्लॅटचे कुलुप बनावट किल्लीने उघडून फौजदार महिलेच्या सरकारी रिव्हॉल्वरसह सोन्याच्या २ बांगड्या चोरांनी लंपास केल्या. स्मिता पाटील (वय २६ शिवालय सोसायटी, साई चौक, सूस रस्ता, पाषाण ) यांनी याबाबत फिर्याद केली आहे.१९ तारखेच्या दुपारी साडेचार पासून २१ तारखेच्या सकाळपर्यंत त्यांचा फ्लॅट कुलुपबंद होता. चोरांनी बेडरूमच्या लाकडी ड्राव्हरमध्ये ठेवलेले रिव्हॉल्वर आणि ४५ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. पाटील आणि त्यांचे पती सकाळी कामानिमित्त बाहेर पडतात, आणि सायंकाळनंतर परततात. पाटील यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त संचलनाची तयारी करावयाची असल्याने त्या रिव्हॉल्वर न घेताच घरातून जात होत्या. ------- नर्हे गावात महिलेचा अपघाती मृत्युपुणे : नर्हे गावातील तानाजीनगरमध्ये भरधाव दुचाकीची धडक बसून महिलेचा मृत्यु झाला. २० तारखेला रात्री नऊच्या सुमारास झालेल्या या अपघातातील महिलेचे नाव शोभा प्रकाश काटवटे (वय ४५ कुंभारचावडी, धायरी)असे आहे. त्यांच्या मृत्युस कारण झाल्याच्या आरोपावरून निरंजन विटकर याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.------- हरित न्यायप्राधिकरणात गैरहजर राहिल्याने ४ जिल्हाधिकार्यांवर वॉरंटपुणे : फ्लोरोसिससारख्या गंभीर विकारावर बाजू मांडण्यासाठी गैरहजर राहिल्याने राष्ट्रीय हरित न्यायप्राधिकरणाचे न्यायाधीश विकास किनगावकर आणि डॉ.अजय देशपांडे यांनी नांदेड, चंद्रपूर, परभणी आणि हिंगोलीच्या जिल्हाधिकार्यांना जामिनपात्र वॉरंट जारी केले. या जिल्हाधिकार्यांनी जामिनाची प्रत्येकी २० हजार रूपयांची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. भुजलाचा दर्जा निकृष्ट झाल्याने सामान्य नागरिकांना प्लोरोसिससारख्या गंभीर विकारांचा सामना करावा लागत असून पिण्याच्या पाण्याचा प्रदूषित पुरवठा, पाण्याचा बेकायदेशीर उपसा, फ्लोराईयुक्त पाण्यामुळे चिंताजनक झालेले आरोग्य प्रश्न असे विषय असताना संबंधित जिल्हाधिकार्यांनी न्यायालयात साधी उपस्थितीही ठेवली नाही.त्याची खेदपूर्वक नोंद या न्यायालयाने घेतली आहे. नांदेड, बीड, यवतमाळ, लातूर, वाशिम, परभणी, हिंगोली,जालना, जळगाव, नागपूर, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये फ्लोरोसिससारख्या विकारांनी नागरिक बाधित आहेत.बेकायदेशीरपणे विंधन विहिरी घेणे,अति पाणी उपसा करणे, शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यात शासनाचे दुर्लक्ष अशा अनास्थेमुळे ॲड.असीम सरोदे व त्यांच्या सहकार्यांनी जनहित अर्ज दाखल केला होता. त्यानंतर १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांनी राष्ट्रीय हरित न्यायप्राधिकरणात हजर राहावे अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावरही जिल्हाधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने न्यायाधिकरणाने हा आदेश दिला.------