एसटी बसमधून दागिने पळविले
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
एसटी बसमधून दागिने पळविले
एसटी बसमधून दागिने पळविले
एसटी बसमधून दागिने पळविलेनागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून रविवारी एसटी बसने नागपुरात आलेल्या प्रवाशाचे २६ हजार रुपयांचे दागिने प्रवासात अज्ञात आरोपीने पळविल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किरण विश्वेश्वर लाभे (५७) रा. यशवंतनगर हिंगणघाट जि. वर्धा हे आपल्या नातीच्या बारशासाठी एसटी बस क्रमांक एम.एच. ४०-४१५७ ने हिंगणघाटवरून नागपुरात आले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाताळेश्वर रोड चांदे गल्ली महाल येथे त्यांनी आपली सुटकेस उघडली. त्यांना सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे २६ हजार रुपये किमतीचे दागिने आढळले नाही. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दिल्यावरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.