शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खुनी पित्यासोबत जेलमध्ये राहून केली जेईई क्रॅक

By admin | Updated: July 1, 2016 05:20 IST

ध्येय, चिकाटी आणि जिद्द असली की प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून यश मिळविता येते.

जयपूर : ध्येय, चिकाटी आणि जिद्द असली की प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून यश मिळविता येते. कोटा येथील पीयूष मीना याने असेच अपवादात्मक यश मिळवित इतरांसाठी आदर्शवत ठरणारी स्वत:ची अनोखी कहाणी घडवली आहे.पूर्वाश्रमीचे शासकीय शिक्षक असलेले वडील फुलचंद हे हत्येच्या आरोपाखाली कारागृहात असल्यामुळे आणि होस्टेलची फी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे वडील राहत असलेल्या खुल्या कारागृहातील ८ बाय ८च्या सेलमध्ये राहून त्याला अभ्यास करावा लागला. आयआयटी प्रवेशासाठी असलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत ४५३वी रँक (अनुसूचित जमाती श्रेणी) घेत त्याने मिळविलेले यश म्हणूनच अनोखे ठरते. खुल्या कारागृहात आरोपीसोबत कुटुंबीयांना राहता येत नाही, पण आरोपीला दररोज कमाईसाठी बाहेर जाता येते. मला मुुलाच्या कोचिंग आणि होस्टेलसाठी २ लाख रुपयांची गरज होती. नातेवाईक, मित्रांची मनधरणी करून १ लाख रुपये जमवता आले, पण त्यात कोचिंगची फीसुद्धा भागत नव्हती.पीयूषचे आयआयटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खासगी शाळेत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्यावरील खुनाचा आरोप त्यात अडसर ठरत होता. त्यामुळे मेडिकल स्टोअरमध्ये मदतनीस म्हणून कमी पगाराची नोकरी स्वीकारली, असे फुलचंद यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)खिडकीतील कवडसा ठरला आधार...कारागृहातील अनुभव सांगताना पीयूष भावुक झाला, पण यशाचा आनंदही त्याला लपवता आला नाही. कारागृहातील कडक नियमांमुळे मला प्रारंभी अभ्यास करता येत नव्हता. रात्री ११ वाजता दिवे बंद व्हायचे. खिडकीतून येणाऱ्या अंधुक प्रकाशात मी अभ्यास केला. खोली छोटी असल्याने अभ्यास होईस्तोवर पहाटे ४ वाजेपर्यंत वडील सेलबाहेर थांबायचे, असे त्याने सांगितले.मी वडिलांसोबत कारागृहात राहतो हे कुणालाही सांगितले नव्हते मात्र आता वडिलांनी माझ्यासाठी जे केले त्याची तुलना कुणीही करू शकत नाही असे मी अभिमानाने सांगत आहे, असे त्याने म्हटले. फुलचंद यांनी १२ वर्षे कारागृहात काढली. आणखी दोन वर्षांनी शिक्षा पूर्ण होताच मुक्त होण्याची त्यांना आशा आहे. कारावास पूर्ण होताच पीयूषला चांगले आयुष्य देणे हेच माझे ध्येय आहे, असे ते म्हणाले.