मुंबई : बिहारमध्ये सत्तास्थानी असलेल्या खासदार शरद यादव यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेडने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. राज्यात एकूण १९ जागांवर उमेदवार देतानाच तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचे संकेतही पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि राज्याचे प्रभारी तारिक चुनावाला यांनी दिले आहेत. जनता दलाच्या महाराष्ट्र शाखेने विधानसभा लढण्याची तयारी दर्शवली असून, पक्षाचे कार्यक्षेत्र असलेल्या कुलाबा, चेंबूर, वर्सोवा, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि कळवा-मुंब्रा या जागांवर उमेदवारांची निश्चिती करण्यात आली आहे. मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
जदयू १९ जागा लढविणार!
By admin | Updated: September 23, 2014 02:32 IST