शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जयललितांच्या भाचीचा राजकारणात प्रवेश

By admin | Updated: February 14, 2017 22:11 IST

जयललितांची भाची दीपा जयकुमार यांनी आज राजकारणात प्रवेश केला आहे.

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 14 - जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी पनीरसेल्वम आणि शशिकला असे दोन गट पडले आहेत. जयललितांची भाची दीपा जयकुमार यांनी आज राजकारणात प्रवेश केला आहे. प्रभारी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यासोबत दीपा जयकुमार यांनी चेनन्नईतील मरीन बीचवर जाऊन जयललीतांच्या स्मृतीला अभिवादन करत राजकारण प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.जयललितांच्या भावाची मुलगी असलेल्या दीपा यांचे शिक्षण लंडनमध्ये झाले असून, जयललिता यांच्यावर उपचार सुरू असताना आपल्याला जयललिता यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप केल्यावर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. तसेच जयललितांच्या अंत्ययात्रेतही आपल्याला जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. 42 वर्षीय दीपा यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तामिळनाडूत लागत असलेल्या त्यांच्या पोस्टरमध्ये त्यांच्या चेहऱ्याची ठेवण जयललितांच्या चेहऱ्याशी मिळताजुळता ठेवण्याची काळजी घेतली जात आहे. तसेच चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित त्या जयललिता यांच्यासारख्याच साड्या परिधान करत आहेत. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दोषी ठरवत त्यांना चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर काही तासातच शशिकला यांनी अण्णा द्रमुक पक्षातून मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह 20 नेत्यांची हकालपट्टी केली.दरम्यान, पनीरसेल्वम यांनी सर्व आमदारांना मतभेद बाजूला ठेऊ, पक्ष एकसंध ठेवण्यासाठी एकत्र काम करु आणि अम्माची सत्ता कायम राखू असे आमदारांना आवाहन केले आहे. अम्माची धोरणे, योजना यापुढे कायम सुरु राहतील. कायदा-सुव्यवस्था राखणे आमची जबाबदारी आहे. मला पाठिंबा देणा-या सर्व नेते, कार्यकर्ते, तरुणांचे मी आभारी आहे असे पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. 5 फेब्रुवारीला शशिकलाची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी पनीरसेल्वम यांनी बंडाचे निशाण फडकावले.