शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शशिकलांनी रचला जयललितांच्या मृत्यूचा कट

By admin | Updated: June 12, 2017 00:03 IST

दीपक व शशिकला यांनी जयललिता यांच्या ‘मृत्यूचा कट’ रचल्याचा आरोप तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी केला.

चेन्नई : दीपक व शशिकला यांनी जयललिता यांच्या ‘मृत्यूचा कट’ रचल्याचा आरोप तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी केला. जयललितांच्या पोझ गार्डन निवासस्थानी रविवारी सुरक्षारक्षकांनी मला धक्काबुक्की केल्याचे व परिसरात प्रवेश करू दिला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘‘मी पोझ गार्डनला गेले ते माझा भाऊ दीपक याने बोलावल्यावरून’’, असा दावा करून दीपा जयकुमार यांनी आरोप केला की दीपकने अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या (अम्मा) प्रमुख शशिकला व त्यांचे निकटवर्ती टीटीव्ही दिनकरन यांच्याशी ‘आजची घटना’ घडवून आणण्यासाठी हातमिळवणी केली. या घटनांनंतर त्या भागात तणाव निर्माण झाला व पोलिसांनी सुरक्षा वाढवली. स्वत: दीपकने मला अनेक फोन करून बोलावून घेतले. येथे येण्याचे माझे आज काहीही ठरलेले नव्हते परंतु त्याने मला जयललितांच्या छायाचित्राला पुष्पहार घालण्यास बोलावले, असे दीपा जयकुमार म्हणाल्या. दीपा यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप अ.भा.अ. द्रमुकच्या (अम्मा) सूत्रांनी फेटाळला. दीपा या काहीही न ठरवता आल्या व त्यांना भव्य पोझ गार्डनच्या समोरच्या भागात असलेल्या जयललिता यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालायचा होता, असेही ते म्हणाले. प्रारंभी दीपा यांनी पुष्पहार घातला व त्यानंतर त्यांना घरात प्रवेश करायचा होता त्याला मात्र परवानगी नाकारली, असे सूत्र म्हणाले. मला कोणी धक्काबुक्की केली त्याला मी ओळखू शकते, असे दीपा जयकुमार म्हणाल्या. दीपा जयकुमार म्हणाल्या की, निवासस्थानी दूरचित्रवाणी कॅमेरामनही होते त्यांच्यावरही सुरक्षारक्षकांनी हल्ले केले. आजच्या घटनेबद्दल त्यांनी दीपक यांना सतत दोष दिला व मी तो आणि शशिकला यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.