शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जयललितांच्या जामिनाची मुदत ४ महिन्यांनी वाढली

By admin | Updated: December 19, 2014 04:18 IST

अण्णा द्रमुक पक्षाच्या प्रमुख व तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या खटल्यात याआधी दिलेल्या

नवी दिल्ली : अण्णा द्रमुक पक्षाच्या प्रमुख व तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या खटल्यात याआधी दिलेल्या जामिनाची मुदत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आणखी चार महिन्यांनी वाढविली व जयललिता यांनी केलेल्या अपिलावर सुनावणी करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाने एक स्वतंत्र खंडपीठ नेमावे, असे निर्देश दिले.बेहिशेबी मालमत्तेच्या १८ वर्षे रेंगाळलेल्या एका खटल्यात बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने जयललिता यांना दोन महिन्यांपूर्वी चार वर्षांचा कारावास व १०० कोटी रुपयांची शिक्षा ठोठावली. याविरुद्ध जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अपील केले आहे. शिक्षेला स्थगिती देण्यास किंवा जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला तेव्हा जयललिता सर्वोच्च न्यायालयात आल्या होत्या. गेल्या १७ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांना अंतरिम जामिन मंजूर केला होता. गुरुवारी या प्रकरणी सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु व न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठापुढे पुढील सुनावणी झाली. खंडपीठाने जयललिता यांच्या जामिनाची मुदत आणखी चार महिन्यांसाठी म्हणजे १८ एप्रिलपर्यंत वाढविली. तसेच जयललिता यांच्या अपिलावरील सुनावणीसाठी कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतंत्र खंडपीठ नेमावे व या खंडपीठाने रोजच्या रोज सुनावणी घेऊन अपिल तीन महिन्यांत निकाली काढावे, असे निर्देशही दिले.(लोकमत न्यूज नेटवर्क)