चेन्नई : अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा ६७ वर्षीय जयललिता शनिवारी पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी बसतील. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या त्यांना निर्दोष सोडणाऱ्या निकालाने त्यांचा मुख्यमंत्रिपदी परतण्याचा मार्ग प्रशस्त बनला. शुक्रवारी पक्षाच्या आमदारांनी औपचारिकरीत्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची निवड केली.मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात त्या शनिवारी ११ वाजता शपथ घेणार असल्याचे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने बेहिशेबी संपत्तीप्रकरणी ११ मे रोजी जयललितांना निर्दोष ठरविले आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडले होते. - सविस्तर वृत्त/१०
जयललिता पुन्हा मुख्यमंत्रिपदी!
By admin | Updated: May 23, 2015 01:53 IST