शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जवानांनी उधळला लष्करी तळावर घुसण्याचा प्रयत्न, ३ अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Updated: October 6, 2016 10:45 IST

लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा अतिरेक्यांनी लष्करी तळावर हल्ला केला.

 ऑनलाइन लोकमत 

हंडवारा, दि. ६ -  बारामुल्ला येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा अतिरेक्यांनी लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील लंगेट येथील ३० राष्ट्रीय रायफल्सच्या तळाजवळ अतिरेक्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन अतिरेकी ठार झाले. 
 
अतिरेक्यांचा लष्करी तळामध्ये घुसण्याचा प्रयत्न सर्तक जवानांनी हाणून पाडला. लष्कराने परिसराला घेराव घातला असून शोधमोहिम सुरु आहे. सकाळी पाचच्या सुमारास अतिरेक्यांनी गोळीबार करताच जवानांनी लगेच प्रत्युत्तर दिले अशी माहिती लष्करी अधिका-यांनी दिली. 
 
जवळपास तासाभर गोळीबार सुरु होता. तळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांना सुरक्षाकडे भेदता आले नाही. अद्यापपर्यंत कुठल्या जिवीतहानीचे वृत्त नाही. रविवारी रात्री अतिरेक्यांनी बारामुल्ला येथील लष्करी तळाजवळ केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. 
 
भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून उरी दहशतवादी हल्ल्याचा हिशेब चुकता केल्यानंतर पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांच्या कारवायात मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे तर, अतिरेकी काश्मीरमध्ये लष्करी तळांना लक्ष्य करत आहेत.