शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जाट आरक्षण विधेयक विधानसभेतही मंजूर

By admin | Updated: March 29, 2016 15:39 IST

जाट समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक विधानसभेतही एकमताने मंजूर करण्यात आले आहे

ऑनलाइन लोकमत -
चंदिगड, दि. २९ - जाट समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक विधानसभेतही एकमताने मंजूर करण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधेयक मंजूर करण्यात आले होते त्यानंतर मंगळवारी विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे विधेयक मांडले गेले. त्यावेळी एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयक मंजूर करण्यात आले तेव्हा काँग्रेस आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. 
 
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. 15  मिनिटांत हे विधेयक मंजूर करण्यात आले. जाट समाजाने आपली आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी ३ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती आणि मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. जाटांनी गेल्या महिन्यात आरक्षणाच्या मागणीवरून हिंसक आंदोलन केले होते.
 
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागासवर्गीय जमातींसाठी नव्याने बनवण्यात आलेल्या बीसी-3 या श्रेणीत जाट समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. बीसी 1 आणि बीसी 2 श्रेणीअंतर्गत अगोदरच मागासवर्गीय जमातींसाठी सरकारी नोकरीत 27 टक्के आरक्षण लागू आहे
 
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाट आणि अन्य चार जातींना आरक्षण देण्याच्या संदर्भातील मसुदा विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. विधेयकात जाट आणि जाट शीख, रोर, बिष्णोई आणि त्यागी या अन्य चार जातींच्या लोकांनाही आरक्षण देण्याची तरतूद केली आहे. या सर्व पाचही जातींसाठी मागासवर्गीय प्रवर्गामध्ये नवे वर्गीकरण तयार करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.