शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
2
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
5
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
8
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
9
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
10
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
12
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
13
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
14
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
15
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
16
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
17
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
18
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
19
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
20
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा

२३ जानेवारी कुजबूज

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

कुजबूज--(२३ जानेवारी-सद्गुरू)

कुजबूज--(२३ जानेवारी-सद्गुरू)
फक्त बुथ अध्यक्ष
पणजी हे राजधानीचे शहर. या शहरात काँग्रेस हाउस म्हणजे गोव्यातील काँग्रेसचे मुख्यालयही आहे. अशा ठिकाणी तरी काँग्रेस पक्ष संघटना बळकट असायला नको काय? परवा फालेरो यांनीच पत्रकार परिषदेनंतर चहा पिताना अनौपचारिकपणे सांगितले, की पणजीत काँग्रेसजवळ फक्त बुथ समितीचा अध्यक्ष तेवढा आहे. बाकी बुथ समितीदेखील नाही. आता बोला. सुभाष शिरोडकर, जॉन फर्नांडिस हे माजी प्रदेशाध्यक्ष पणजीत बुथ समिती स्थापन करू शकले नाहीत. फालेरो हे प्रदेशाध्यक्ष बनून तीन महिने झाले; पण तेही बुथ समिती नियुक्त करू शकले नाहीत. आता पणजीसाठी प्रचार समिती शोधण्याकरिता धावपळ चालली आहे. सुरेंद्र फुर्तादो यांनाच प्रचार समिती तुम्ही तयार करा, असे सांगण्यात आले आहे. अशी स्थिती असताना हा पक्ष राज्यात सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत आहे. गुरुवारी जर काँग्रेसची पणजीत कार्यकारिणी बैठक नसती तर फुर्तादो यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरताना पंधरा माणसेही दिसली नसती. केवळ राणे, फालेरो, फुर्तादो व त्यांचे दोन-तीन मित्र तेवढे दिसले असते. दिनार तारकर यांनी २००७ साली काँग्रेसची निवडणूक लढवताना मंगेश वायकर वगैरे कार्यकर्त्यांना जवळ केले होते. ते टापटीप वायकर महाशय सध्या भाजपच्या प्रचारात मग्न आहेत.
.............................
परफॉर्मन्स दाखवा ना...
मगो पक्षाचे मंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत व तिथे कामे करत असल्याने आमची अडचण होत आहे, असे भाजपचे काही मंत्री व आमदार अलिकडे वारंवार सांगतात. मगोचे मंत्री आमच्या मतदारसंघात येऊन परफॉर्मन्स दाखवतात, अशी तक्रार वारंवार भाजपवाले करत असल्याने एका वृत्त वाहिनीवरील चर्चात्मक कार्यक्रमावेळी मगोचे आमदार लवू मामलेदार यांनी भाजपवाल्यांना उत्तर दिले आहे. मगोचे मंत्री परफॉर्मन्स दाखवत असतील तर तुम्हीही परफॉर्मन्स दाखवा ना, असा सल्ला लवू मामलेदार यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिला आहे. अर्थात, मामलेदार यांचा सल्ला पटण्यासारखाच आहे. प्रियोळ व फोंडा मतदारसंघ हे मगो पक्षाकडे असताना भाजपवाले येऊन या मतदारसंघात काम करतात, त्यांना आम्ही अडवत नाही. पर्यटन, उद्योग अशी अनेक महत्त्वाची खाती भाजपच्या मंत्र्यांकडे आहे. त्या खात्यांनी सर्वत्र परफॉर्मन्स दाखवा ना, असे मामलेदार म्हणतात.