अंदरसूूल येथे जनधन योजना चर्चासत्र
By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST
अंदरसूल : येथील बँक ऑफ बडोदाच्या वतीने भारत सरकारच्या पंतप्रधान जनधन योजना व जनधन विमा योजने संदर्भात शाखेतर्फे चर्चासत्राचे व प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक शर्मा यांनी नागरिकांनी जनधन बँक खाते नियमित वापरावेअसे सांगितले. महेंद्र काले (उद्योगपती) यांनी नागरिकांनी कर्जपुरवठा योजनेचा लाभ घ्यावा, तसेच बँक कर्मचार्यांनी ग्राहकांना अधिक चांगला प्रकारची सेवा द्यावी, अशी मागणी केली. शाखा व्यवस्थापक श्याम खोडवे यांनी स्वागत केले. याप्रसंगी खातेदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.