शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक तांदळाने जनता धास्तावली

By admin | Updated: June 8, 2017 00:28 IST

गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश, तेलंगणात खुल्या बाजारात प्लास्टिकच्या तांदळाची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा

हैदराबाद/विशाखापट्टणम : गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश, तेलंगणात खुल्या बाजारात प्लास्टिकच्या तांदळाची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा असून आता हे लोण उत्तराखंडातही पोहोचले आहे. रोजचे मुख्य अन्न असलेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील जनता मात्र धास्तावली आहे. दोन दिवसांपूर्वी हैदराबादेतील सरूरनगरच्या एका ग्राहकाने बिर्याणीत प्लास्टिकचा तांदूळ वापरला जात असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मंगळवारी मीरपेठच्या एका ग्राहकाने असा दावा केला की, किराणा दुकानातून खरेदी केलेला तांदूळ प्लास्टिकचा निघाला. हा प्रकार सोशल मीडियावरूनही झळकल्याने या प्लास्टिकच्या तांदळाच्या चर्चेला चांगलाच ऊत आला. याची गंभीर दखल घेत राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने मीरपेठमधील किराणा दुकानावर धाड टाकून या तांदळाचे नमुने जप्त करून परीक्षणासाठी पाठविले आहेत.>पोटदुखीसोबत हात-पायांना वेदना...मीरपेठ भागातील नंदनवन कॉलनीतून अशोकची अशी तक्रार आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून मी आणि माझे कुटुंबिय पोटदुखीने त्रस्त आहोत. घरातील सर्वांचे हात-पायही ठणकत आहेत. सोमवारी रात्री कामावरून घरी आल्यानंतर बायकोने ताटात वाढलेला भात मोकळा आणि खाण्यालायक नव्हता.नमुने गोळा करण्याचे आदेश...राज्याचे नागरी पुरवठा आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी अधिकाऱ्यांनी युसूफगुडा, सरूरनगर, मीरपेठ आणि तक्रारी आलेल्या ठिकाणी तांदळाचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. हे नमुने परीक्षणासाठी राज्याच्या अन्न-पदार्थ प्रयोगशाळेत पाठविले जातील. शास्त्रीय परीक्षणानंतर नक्की काय भानगड आहे, याचा उलगडा होईल. परीक्षण अहवाल गुरुवारपर्यंत हाती घेईल, असेही त्यांनी सांगितले.