शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू आणि काश्मीर राष्ट्रपती राजवटीकडे

By admin | Updated: January 9, 2015 02:05 IST

ओमर अब्दुल्ला यांच्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या निर्णयानंतर राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू असल्याचे चित्र आहे़

नवी दिल्ली /श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील राजकीय पेचप्रसंगाने गुरुवारी अचानक वेगळे वळण घेतले़ ओमर अब्दुल्ला यांच्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या निर्णयानंतर राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू असल्याचे चित्र आहे़ निवडणूक आयोगाने या राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे.राज्यपाल एऩएऩव्होरा यांनी केंद्राला आपला अहवाल पाठवला असून त्यात, जम्मू-काश्मिरात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासह दोन ते तीन पर्याय सुचवले असल्याचे कळते़ताज्या विधानसभा निवडणकीत त्रिशंकू कौल मिळाल्याने कुठलाही पक्ष सरकार स्थापनेच्या स्थितीत नाही़ सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला पीडीपी आणि दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा दोन्हींकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्तास्थापनेबाबत ठोस संकेत मिळालेले नाहीत़ त्यामुळे सरकार स्थापनेबाबत कुठल्याही ठोस हालचाली होत नसल्याचे बघून राज्यपालांनी केंद्राकडे आपला अहवाल पाठविला असल्याचे समजते़ या अहवालात राज्यपालांनी दोन तीन पर्याय सुचवले आहेत. यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाही एक पर्याय असल्याचे कळते़(लोकमत न्यूज नेटवर्क)ओमर काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सोडणारश्रीनगर : सीमेपलीकडून सुरू असलेला गोळीबार व घुसखोरीचे प्रयत्न बघता, राज्यात पूर्णवेळ प्रशासनाची गरज असल्याचे सांगत, जम्मू-काश्मीरचे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय ओमर अब्दुल्ला यांनी घेतला आहे़ ओमर यांनी राज्यपालांची भेट घेऊन या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली.