शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हद्द शहराची नोटीस मात्र जळगाव बुद्रुकची आक्षेप: महामार्गाच्या भूसंपादन मोजणीसाठी १८ गटधारकांना नोटीस

By admin | Updated: December 23, 2015 00:18 IST

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालयाने जळगाव शहर हद्दीतील १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली आहे. जळगाव शहर हद्दीतील शेतजमिन असली तरी भूमि अभिलेख कार्यालयाने या सर्वांना जळगाव बुद्रुक भागातील शेत गटनावाने नोटीस बजावली आहे. शेतकर्‍यांनी जमिनीच्या मोजणीला आक्षेप नोंदविला आहे.

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालयाने जळगाव शहर हद्दीतील १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली आहे. जळगाव शहर हद्दीतील शेतजमिन असली तरी भूमि अभिलेख कार्यालयाने या सर्वांना जळगाव बुद्रुक भागातील शेत गटनावाने नोटीस बजावली आहे. शेतकर्‍यांनी जमिनीच्या मोजणीला आक्षेप नोंदविला आहे.
अमरावती ते चिखली, चिखली ते फागणे व फागणे ते नवापूर अशा तीन टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम होणार आहे. चौपदीकरणासाठी जळगाव जिल्‘ातून एकूण ३८० हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. पैकी २७५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. जळगाव शहरातून जाणार्‍या मार्गाचे भूसंपादन तसेच जमिनीची मोजणीचे काम बाकी आहे. त्यानुसार जळगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शहर हद्दीतील १८ शेतमालकांना मोजणीसाठी नोटीस पाठविली आहे.
हद्द शहराची नोटीस मात्र जळगाव बुद्रुकची
भूमि अभिलेख कार्यालयाने सर्व शेतकर्‍यांना जळगाव बुद्रुक या नावाने नोटीस बजावली आहे. मात्र प्रत्यक्षात ही हद्द जळगाव शहरातील असल्याचे शेतमालकांचे म्हणणे आहे. ज्या शेतकर्‍यांच्या जमिनीची मोजणी होणार आहे, त्या शेतकर्‍यांनी जळगाव शहर या नावाने जिल्हा प्रशासनाने मोजणी करावी तसेच मोजणी करतेवेळी नकाशे हे जळगाव शहराच्या नावाने असावे असा पवित्रा घेतला आहे. प्रशासन जो पर्यंत शेतकर्‍यांच्या या दोन अटी मान्य करीत नाही तोपर्यंत जमिनीची मोजणी करू देणार नाही असा पवित्रा घेण्यात आला आहे.
शहराचा नकाशा आजही जळगाव बुद्रुक नावानेच
गॅझेटमध्ये तांडेज गावाचा काही भाग असलेल्या जळगाव शहराचा नकाशा हा आजही जळगाव बुद्रुक नावाने आहे. तर सात बारा उतारे हे १०० वर्षांपासून शहराच्या नावाने आहे. जिल्हा प्रशासन भूमि अभिलेख कार्यालयाकडे असलेल्या उतार्‍यांच्या आधारावर मोजणी करण्यासाठी आग्रही आहे. तर शेतकरी हे जळगाव शहरांच्या उतार्‍यानुसार मोजणी व्हावी या मागणीवर शेतकरी ठाम आहे. काही महिन्यांपूर्वी भूसंपादन केलेल्या जमिनीची मोजणी ही जळगाव बुद्रुक नावाने केली आहे. यावेळी या भागात २० रुपये फूट आणि २०० रुपये मीटर अशा रेडिरेकनरची आकारणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र शहर हद्दीतील रेडिरेकनरचा दर हा मीटरला दहा हजाराच्या जवळपास आहे.