शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

...तर मानहानीची रक्कम वाढवेन, जेटलींचा जेठमलानींना इशारा

By admin | Updated: May 17, 2017 19:50 IST

केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांच्यात दिल्ली उच्च न्यायालयात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांच्यात दिल्ली उच्च न्यायालयात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. जेटलींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांविरोधात केलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीदरम्यान हा वाद उफाळून आला आहे. केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या इतर नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या 10 कोटींच्या मानहानीच्या खटल्यात जेटलींचा जबाब नोंदवला गेला नाही. वकील जेठमलानींनी अरुण जेटलींविरोधात वापरण्यात आलेल्या अपशब्दावर कोर्टानं आपत्ती दर्शवली आहे. संयुक्त रजिस्ट्रार दीपाली शर्मांसमोर अर्थमंत्री जेटलींनी जेठमलानींना विचारलं की, केजरीवालांच्या निर्देशानुसारच तुम्ही माझ्याविरोधात अपशब्द वापरले आहेत. जेटली म्हणाले, जर केजरीवालांच्या निर्देशावरून तुम्ही माझ्याविरोधात अपशब्द वापरत असल्यास मी केजरीवालांविरोधात आरोप वाढवेन, वैयक्तिक द्वेषाचीही एक मर्यादा असते, असंही जेटलींनी जेठमलानींना सुनावलं आहे. 
तत्पूर्वी अरुण जेटलींच्या 13 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डीडीसीएमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. जेटलींच्या कारकिर्दीत डीडीसीएला फिरोजशहा कोटला स्टेडिअमसाठी नियम धाब्यावर बसवून परवानगी मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. केजरीवालांनी केलेल्या आरोपांमुळे डीडीसीएची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत डीडीसीए आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले होते. दरम्यान, केजरीवालांच्या वक्तव्यामुळे डीडीसीएची प्रतिमा डागाळल्याचं न्यायालयाने मान्य केलं होतं.