शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीसाठी जेटलींची ‘वॉर रूम’

By admin | Updated: September 22, 2016 04:03 IST

वस्तू व सेवा कराच्या दैनंदिन अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थ मंत्रालयात खास ‘वॉर रुम’ स्थापन करण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतला

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराच्या दैनंदिन अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थ मंत्रालयात खास ‘वॉर रुम’ स्थापन करण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतला आहे. या वॉररुममध्ये महसूल आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी असतील. गेल्या आठवड्यात अर्थमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती. या बैठकीत वॉर रुमची आवश्यकता समोर आली. त्यानंतर तिच्या स्थापनेचा निर्णय झाला. या बैठकीला इन्फोसिसचे सीईओ विशाल शिक्का यांचीही उपस्थिती होती. गेल्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका आढावा बैठकीत जीएसटी कुठल्याही परिस्थितीत १ एप्रिलपासून लागू झाला पाहिजे, असे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत जीएसटीच्या अंमलबजावणीतील अनेक अडथळ््यांवर चर्चा झाली. त्यातील एक बाब तंत्रज्ञानविषयक होती. जीएसटीचा सगळा कारभार आॅनलाईन असणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम इन्फोसिसला देण्यात आले आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षे देखभालीचे कामही कंपनीकडेच सोपविण्यात आले आहे. राज्यांना जोडणाऱ्या या सॉफ्टवेअरची चाचणीच अजून झालेली नाही. देशातील २२ राज्यांचे सॉफ्टवेअरही इन्फोसिसच विकसित करीत आहे. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारखी काही राज्ये आपले सॉफ्टवेअर स्वत:च विकसित करीत आहेत. दोन सॉफ्टवेअर एकमेकांसोबत जोडले जातात काय? जोडणीनंतर ते योग्य प्रकारे काम करतील का? इ. प्रश्नांची उत्तरे चाचणीनंतरच मिळू शकतील. जोडणीत काही दोष असल्यास त्यावर उपाय शोधावे लागतील. जीएसटीचे दर ठरलेले नसल्यामुळे सॉफ्टवेअरला अंतिम रुप देता येत नाही, हीही यातील एक अडचण आहे. जीएसटीमध्ये आपली भूमिका नेमकी काय असणार आहे, याबाबत महसुली अधिकाऱ्यांत संभ्रम आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पहिली बैठक आजनवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची पहिली बैठक गुरुवारी होत आहे. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. जीएसटीचा दर किती असावा, तसेच जीएसटीच्या कक्षेबाहेर कोणत्या वस्तू असाव्यात यावर परिषदेला निर्णय घ्यायचा आहे. १ एप्रिलपासून जीएसटी लागू करायचा असल्यामुळे परिषदेसमोर वेळ खूप कमी आहे. केंद्रीय वित्तमंत्री परिषदेचे अध्यक्ष आहेत. महसूल सचिव तसेच वित्त राज्यमंत्री परिषदेचे सचिव आहेत.