शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जेटलींचा केजरीवालांविरोधात दुस-यांदा 10 कोटींचा मानहानीचा दावा

By admin | Updated: May 22, 2017 15:39 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दुस-यांदा केजरीवालांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दुस-यांदा केजरीवालांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. जेटलींच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दुसरा खटला केजरीवालांविरोधात भरला आहे. जेटलींनी केजरीवालांविरोधात पहिल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीवेळी केजरीवालांचे वकील राम जेठमलानी यांनी क्रूक(शातिर) या शब्दाचा वापर केला होता. त्यावर जेटलींनी नाराजी व्यक्त करत मानहानीची रक्कम वाढवण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी प्रकरणातल्या खटल्यात सुनावणी सुरू होती. त्याच वेळी केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनी जेटलींविरोधात क्रूक या शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर दोन्ही पक्षकारांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर कोर्टानं सुनावणी स्थगित केली. केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या इतर नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या 10 कोटींच्या मानहानीच्या खटल्यात जेटलींचा जबाब नोंदवला गेला नाही. वकील जेठमलानींनी अरुण जेटलींविरोधात वापरण्यात आलेल्या अपशब्दावर कोर्टानं आपत्ती दर्शवली होती. संयुक्त रजिस्ट्रार दीपाली शर्मांसमोर अर्थमंत्री जेटलींनी जेठमलानींना विचारलं की, केजरीवालांच्या निर्देशानुसारच तुम्ही माझ्याविरोधात अपशब्द वापरले आहेत का. जेटली म्हणाले, जर केजरीवालांच्या निर्देशावरून तुम्ही माझ्याविरोधात अपशब्द वापरत असल्यास मी केजरीवालांविरोधात आरोप वाढवेन, वैयक्तिक द्वेषाचीही एक मर्यादा असते, असंही जेटलींनी जेठमलानींना सुनावलं होतं. 
अरुण जेटलींनी 13 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डीडीसीएला फिरोजशहा कोटला स्टेडिअमसाठी नियम धाब्यावर बसवून परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. केजरीवालांनी केलेल्या आरोपांमुळे डीडीसीएची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत डीडीसीए आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले होते. दरम्यान, केजरीवालांच्या वक्तव्यामुळे डीडीसीएची प्रतिमा डागाळल्याचं न्यायालयाने मान्य केलं होतं. त्यानंतर जेटलींनीही केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला भरला होता.