शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जेटलींनी सादर केला 'उत्तम' अर्थसंकल्प

By admin | Updated: February 1, 2017 15:12 IST

वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज 'उत्तम' अर्थसंकल्प सादर केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 -  वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज 'उत्तम' अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून FUTURE अर्थात शेतकरी, वंचितांचा विकास, पारदर्शकता, शहरी विकास, ग्रामीण विकास आणि रोजगार यांच्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. 
स्वातंत्र्यानंतर प्रथमच आज केंद्रीय अर्थसंकल्पामधून रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आला. पंतप्रधान मोदींनी रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पाला जोडणे ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगत ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी जेटलींचे अभिनंदन केले. "या अर्थसंकल्पामुळे विकासाला चालना मिळेल, शिक्षण ते उद्योग प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे," असे ते म्हणाले. 
शेतकरी, ग्रामीण भारत, गरीब, शोषित यांच्या विकासावर अर्थसंकल्पातून भर देण्यात आल्याचे सांगत मोदींनी अर्थसंकल्पातील काही ठळक बाबींवरही प्रकाश टाकला.  2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, या अर्थसंकल्पामुळे देशातील प्रत्येक वर्गाचे स्वप्न साकार होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
रेल्वे अर्थसंकल्पातून सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिल्याने करचोरी आणि काळ्या पैशावार नियंत्रण आणता येईल. सध्या विविध  बदलांमधून जात असलेल्या आपल्या देशात ही बदलाची प्रक्रिया सुलभपणे पार पडण्यासाठी अर्थसंकल्पातून हातभार लागेल अशी आशाही मोदींनी व्यक्त केली.