शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

जेटली-जेठमलानी यांच्यात खडाजंगी

By admin | Updated: May 18, 2017 04:29 IST

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि राम जेठमलानी या दोन मुरब्बी वकिलांमध्ये बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात जोरदार शाब्दिक खडाजंगी

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि राम जेठमलानी या दोन मुरब्बी वकिलांमध्ये बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध जेटली यांनी दाखल केलेल्या १० कोटींच्या बदनामी दाव्यात, केजरीवाल यांचे वकील या नात्याने जेटलींची उलटतपासणी घेताना, जेठमलानी यांनी एक ठरावीक शब्द वापरण्यावरून दोघांमध्ये ही तणातणी झाली.जेटली यांची उलटतपासणी नोंदविण्याचे काम न्यायालयाच्या सहनिबंधक दीपाली शर्मा यांच्यासमोर सुरू होते. जेटमलानी प्रश्न विचारण्याच्या नावाखाली आपली बदनामी करत आहेत, हे पाहून जेटली यांचा संयम सुटला व त्यांनी जेठमलानींच्या ठरावीक शब्द वापरण्यावर आक्षेप घेतला. तरीही जेठमलानी यांनी तोच पवित्रा कायम ठेवल्यावर, निबंधक शर्मा यांनी वकिलांना मर्यादा न सोडण्याची समज दिली. नंतर केजरीवाल यांच्या बाजूनेच विनंती करण्यात आल्याने, पुढील कामकाज २८ व ३१ जुलै रोजी ठेवण्यात आले.उलटतपासणीच्या दरम्यान एका टप्प्याला शब्दावरून शब्द वाढत गेला आणि ‘जेटली आपल्या मनातील गुन्हेगारीची भावना दडवून लोकांना फसवीत आहेत,’ असे जेठमलानी म्हणाले. यावर जेटली यांनी आक्षेप घेतला व तुम्ही ही भाषा तुमचे अशील केजरीवाल यांच्या सांगण्यावरून वापरत आहात का, असे विचारले. तसे असेल, तर आपण बदनामीचा आणखी गंभीर आरोप ठेवू, असे जेटली म्हणाले.लढाईला आले नवे स्वरूपन्यायालयातील ही लढाई अरुण जेटली वि. अरविंद केजरीवाल अशी आहे, राम जेठमलानी वि. अरुण जेटली अशी नाही, याचाही जाणीव राजीव नायर आणि संदीप सेठी या जेटलींच्या ज्येष्ठ वकिलांनी जेठमलानी यांना करून दिली. यावर, केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच आपण हा शब्द वापरत असल्याचे जेठमलानी म्हणाले. मात्र, सुरुवातीपासून या दाव्यात केजरीवाल यांच्या वतीने काम पाहणारे वकील अनुपम श्रीवास्तव यांनी केजरीवाल यांनी असे काही सांगितलेले नाही, असे सांगून जेठमलानी यांना खोटे पाडले.