शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली क्रिकेट घोटाळ्यात जेटली-केजरी यांच्यात जुंपली

By admin | Updated: December 21, 2015 02:27 IST

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील कथित घोटाळ्यावरून या संघटनेचे माजी अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात रविवारी चांगलीच जुंपली.

नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील कथित घोटाळ्यावरून या संघटनेचे माजी अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात रविवारी चांगलीच जुंपली. बेजबाबदार आणि निखालस खोटे आरोप केल्याबद्दल केजरीवाल व आम आदमी पार्टीच्या इतर नेत्यांवर बदनामीचे फौजदारी व दिवाणी खटले दाखल करण्याचे जेटली यांनी टिष्ट्वटरवरून जाहीर केले. दुसरीकडे केजरीवाल यांनी या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ गोपाळ सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्याचे ठरविले.राजकीय आखाड्यात सुरू झालेल्या या वादात क्रिकेटपटूही उतरले. भाजपा खासदार व माजी कसोटीपटू कीर्ती आझाद यांनी एक पत्रपरिषद घेऊन जेटलींना थेट न गुंतविता दिल्ली क्रिकेट संघटनेतील ८७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ‘भंडाफोड’ केला. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग व इशांत शर्मा यांनी टिष्ट्वटरवरून जेटलींची पाठराखण केली व दिल्लीच्या क्रिकेटमध्ये जे काही चांगले झाले ते जेटलींमुळेच झाले, अशी भलामण त्यांनी केली.केजरीवाल यांच्याखेरीज कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंग, राघव चड्ढा व दीपक बाजपेयी या ‘आप’च्या नेत्यांविरुद्ध खटले दाखल करण्यास आपण वकिलांच्या चमूला सांगितले आहे. हे खटले आपण केंद्रीय मंत्री म्हणून नव्हे, तर व्यक्तिगत स्वरूपात दाखल करणार आहोत.- अरुण जेटली, टिष्ट्वटरवर