शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीचे फायदे दिसू लागले आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:05 IST

१ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराचे फायदे आता दिसू लागले असून, या ‘एक देश एक कर’ प्रणालीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाले आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : १ जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराचे फायदे आता दिसू लागले असून, या ‘एक देश एक कर’ प्रणालीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाले आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आकाशवाणीवरील आपल्या ३४व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते.     मोदी म्हणाले की, कोट्यवधी लोकांच्या सहकार्याने हे मोठे परिवर्तन झाले आहे. एवढ्या विशाल देशात ते लागू करणे व यशस्वीपणे पुढे जाणे ही यशाची नवी उंची आहे. जगभरातील विद्यापीठांसाठी हे ‘केस स्टडी’ ठरू  शकते. जीएसटी लागू करताना सरकारची ही प्राथमिकता होती की, गरिबांवर याचे ओझे पडायला नको. या कार्यक्रमात मोदी यांनी देशाच्या विविध भागांत आलेल्या पुरांचा उल्लेख केला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाचा उल्लेख केला. सण-उत्सवाच्या काळात गरीब लोकांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. महिला विश्वकप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.ही सांस्कृतिक सुधारणेची मोहीम -ही केवळ सुधारणा नाही तर असे पाऊल आहे जे प्रामाणिकपणाच्या नव्या संस्कृतीला ताकद देणार आहे. एक प्रकारे ही सांस्कृतिक सुधारणेची मोहीम आहे. ग्राहकांचा व्यापा-यांबाबतचा विश्वास वाढत आहे. परिवहन क्षेत्रावरही याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.१ जुलै रोजी देशात लागू करण्यात आलेल्या जीएसटी व्यवस्थेचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, एक देश एक कराचे मोठे स्वप्न साकार झाले आहे. जीएसटी लागू होऊन एक महिना झाला आहे. त्याचे फायदे आता दिसू लागले आहेत. हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. एखादा गरीब व्यक्ती मला पत्र लिहून हे कळवितो की, जीएसटीमुळे एका गरिबाच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाले आहेत तेव्हा अतिशय समाधान वाटते. जीएसटीला मी ‘गुड अ‍ॅण्ड सिंपल टॅक्स’ त्यामुळेच म्हणतो. आमच्या अर्थव्यवस्थेवर याचा कमी काळात सकारात्मक परिणाम झाला आहे. या परिवर्तनातून देशात नवा विश्वास निर्माण झाला आहे. सर्व निर्णय केंद्र आणि राज्य यांनी सर्व सहमतीने घेतले आहेत. संघराज्यीय सहकाराचे हे उदाहरण आहे, कारण या अप्रत्यक्ष करप्रणालीत सर्व निर्णयात राज्ये सहभागी आहेत.